Maize Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize Market : मक्याची उपलब्धता कमी; दरात वाढ होण्याची शक्यता

Maize Rate : सध्या मक्याची उपलब्धता कमी झाल्याने मकादरात वाढ होण्याची शक्यता पोल्ट्री उद्योगाने व्यक्त केली आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : केंद्राने इथेनॉल उत्पादनासाठी मक्याचा जास्तीत जास्त वापर करण्याला प्राधान्य दिले आहे. सध्या मक्याची उपलब्धता कमी झाल्याने मकादरात वाढ होण्याची शक्यता पोल्ट्री उद्योगाने व्यक्त केली आहे.

सुरुवातीला साखरेच्या कमी उत्पादनाच्या अंदाजामुळे सरकारने इथेनॉल उत्पादनासाठी १७ लाख टन साखरेची मर्यादा निश्चित केली आहे. इथेनॉल उत्पादनासाठी अधिक प्रमाणात मका वापरण्याची परवानगी देऊन १५ टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट गाठण्याचे लक्ष ठेवले आहे. ऑक्टोबर २०२३ च्या तुलनेत जानेवारीच्या पहिल्या दोन आठवड्यांत भारतात मक्याच्या दरात २० टक्क्यांनी सुधारणा झाली आहे. मात्र, आवश्यक इतका मका उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे.

तेल विपणन कंपन्यांनी मका आणि इतर धान्यांपासून इथेनॉलची खरेदी किंमत ५.७९ रुपयांनी वाढवून ७१.८६ रुपये प्रतिलिटर केली आहे. केंद्राने वळवल्या जाणाऱ्या मक्याचे प्रमाण जाहीर केले नसले तरी, पोल्ट्री उद्योगाचा अंदाज आहे की उत्पादित मक्यापैकी १० ते २० टक्के मका इथेनॉल उत्पादनाकडे वळवला जाऊ शकतो, परिणामी मागणी-पुरवठ्यातील तफावत वाढू शकते.

याचाच परिणाम म्हणून मक्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. पुरवठा कमी झाल्यामुळे मक्याचे भाव सध्याच्या २५ रुपये प्रतिकिलोवरून ३० रुपये प्रतिकिलोवर जाऊ शकतात. सरकारने नॉन-जेनेटिकली मॉडिफाइड (GM) मका आयात करण्यास परवानगी दिली आहे, जी केवळ काही देशांनी उत्पादित केली आहे.

याशिवाय मक्यावर ५०-५५ टक्के आयात शुल्क लावले जाते. सरकारने आयात शुल्क माफ करावे आणि पोल्ट्री उद्योगाला जीएम मका आयातीची परवानगी द्यावी, अशी पोल्ट्री उद्योगाची मागणी आहे.

२० लाख हेक्टरहून अधिक पेरणी

सध्या मक्याची पेरणी २० लाख हेक्टरहून अधिक झाली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत ४ टक्क्यांनी वाढली आहे. या मध्ये कर्नाटक, मध्य प्रदेश, बिहार, तमिळनाडू, तेलंगणा, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यांचा समावेश आहे.

इथेनॉलसाठी उत्पादनाची मागणी वाढत असल्याने पुढील पाच वर्षांमध्ये मक्याचे उत्पादन १० दशलक्ष टनांनी वाढवण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. इथेनॉलशिवाय पोल्ट्री उद्योगातूनही मक्याला सातत्याने मागणी वाढत आहे. यामुळे मक्याचे दर तेजीत राहण्याचा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Harvesting: हार्वेस्टरने उसाच्या तोडणीतून देशासमोर आदर्श: दिलीपराव देशमुख

Peek Pahani: उन्हाळी हंगामासाठी पीक पाहणी सुरु, पीक नोंदणीचे फायदे काय?

Jal Jeevan Mission: ‘जल जीवन’ला वीज जोडणीची प्रतीक्षा

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; मक्यात काहिशी सुधारणा,गव्हाचे भाव स्थिरावले तर कैरीला काकडीला उठाव

Bajari Awak: खानदेशात बाजरीची आवक सुरू; दर मात्र स्थिर

SCROLL FOR NEXT