Maize Market : खानदेशात मका आवक रखडत

Maize Arrival : खानदेशात मक्याची आवक रखडत सुरू आहे. दर २००० ते २२०० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर असून, रब्बीतील मक्याची काढणी किंवा मळणी अद्याप वेगात सुरू नसल्याने आवक कमी किंवा नीचांकी स्थितीत आहे.
Maize Market
Maize MarketAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात मक्याची आवक रखडत सुरू आहे. दर २००० ते २२०० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर असून, रब्बीतील मक्याची काढणी किंवा मळणी अद्याप वेगात सुरू नसल्याने आवक कमी किंवा नीचांकी स्थितीत आहे. मक्यास उठाव असून, दर मागील चार महिने स्थिर आहेत.

मक्याची लागवड रब्बीतही कमी झाली आहे. खरिपात कमी पावसाने मका पिकाची हानी झाली होती. काही शेतकऱ्यांनी कृत्रिम जलसाठ्यांच्या आधाराने योग्य व्यवस्थापन करून जोमदार उत्पादन घेतले. खरिपातील मक्याचे दरही २१०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटल होते. सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत मक्याची आवक बरी होती.

Maize Market
Maize Market : मका भावाला पोल्ट्री, इथेनॉलचा टेकू

परंतु या महिन्यातील आवक अल्प किंवा अत्यल्प आहे. काही बाजारांतच आवक किंवा लिलाव होत आहेत. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये मक्याची आवक बऱ्यापैकी होती. या कालावधीत मक्याचे सरासरी दर २१०० रुपये प्रतिक्विंटल होते. हेच दर टिकून आहेत. अद्याप मक्यास सरासरी दर २१७० रुपये प्रतिक्विंटल आहेत.

खानदेशात रब्बीत मक्याची लागवड घटली असून, ही लागवड जळगाव जिल्ह्यात सुमारे पाच हजार हेक्टरने कमी झाली आहे. धुळे व नंदुरबारातील लागवडदेखील सुमारे चार हजार हेक्टरने कमी झाली आहे. मक्यास पाणी अधिक लागते. तसेच अळीची समस्या व इतर बाबींवर खर्चही अधिक आहे. कमी पाऊसमान असल्याने लागवड घटली आहे. मक्याऐवजी ज्वारी, हरभऱ्याची पेरणी अनेकांनी केली आहे.

Maize Market
Maize Rate : मक्याच्या बाजारातील सुधारणा टिकेल का?

खानदेशात रब्बीमध्ये मक्याची एकूण लागवड सुमारे ३७ हजार हेक्टर आहे. मागील तीन-चार वर्षांत लागवड सतत कमी झाली आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी खानदेशात मक्याची लागवड ५२ ते ५४ हजार हेक्टरपर्यंत होती. परंतु लष्करी अळीच्या समस्येने व कमी दरांमुळे लागवड कमी झाली आहे. कोविड काळात लागवडीत मोठी घट झाली. यानंतर लागवडीत वाढ झाली नाही. यामुळे खानदेशातील बाजारांत मक्याची आवक पूर्वीपेक्षा कमीच असते.

या बाजारांत कमी आहे आवक

मक्यासाठी खानदेशात जळगाव जिल्ह्यातील चोपडा, अमळनेर, जळगाव या बाजार समित्या प्रसिद्ध आहेत. या बाजारांत सध्या आवक कमी असून, चोपडा येथे मागील सात ते आठ दिवसांत चार दिवस मक्याची आवक झाली.

तेथे प्रतिदिन सरासरी १२५ क्विंटल आवक झाली असून, किमान दर २००१ कमाल दर २२०६ व सरासरी दर २०७१ रुपये प्रतिक्विंटल मिळाले. जळगाव बाजार समितीतही मागील १० ते १२ दिवस मक्याची प्रतिदिन सरासरी १३० क्विंटल आवक झाली असून, सरासरी दर २०६५ रुपये प्रतिक्विंटल मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com