Pomegranate Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Pomegranate Market : पंधरवड्यात डाळिंब दरात घट

Pomegranate Rate : राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती असताना अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबाचा हस्त बहर धरला होता.

मुकूंद पिंगळे

Nashik News : राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती असताना अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबाचा हस्त बहर धरला होता. त्यानुसार मालाची काढणी सुरू झाल्यानंतर दरात सुधारणा दिसून आली होती. मात्र मार्चमध्ये दरात गेल्या पंधरवाड्यात घसरण झाली आहे.

चालू महिन्यात किलोमागे २५ ते ३० रुपयांनी दर कमी झाल्याचे दिसून आले. गुजरात व राजस्थान डाळिंब उत्पादक पट्ट्यात वाढलेली आवक व तुलनेत कमी दरात डाळिंबाची उपलब्धता यामुळे राज्यातील दर दबावात आहेत.

राज्यात गेल्या डिसेंबरनंतर हस्त बहरातील मालाची आवक सुरू आहे. सुरुवातीपासून प्रतवारीनुसार दर मिळत होते. मात्र गेल्या पंधरवड्यात डाळिंब दरात घट झाल्याने आर्थिक फटका बसत आहे. हंगाम पुढे एप्रिल अखेरपर्यंत सुरू राहील, असे चित्र आहे.

राज्यातील शेतकरी हस्त, आंबिया व मृग अशा तिन्ही बहरांत उत्पादन घेत असल्याने वर्षभर डाळिंब उपलब्ध होत असतो. त्यामध्ये मुख्यत्वे उत्तर महाराष्ट्रातील उत्पादित डाळिंब उत्तर भारतात दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड व पूर्व भागात पश्‍चिम बंगालमध्ये जातो.

तर काही प्रमाणात दक्षिण भारतात बंगळूर व चेन्नई बाजारात जात असतो. तर दक्षिण महाराष्ट्रातील माल दक्षिण भारतातील मुख्य बाजारपेठेत जात असतो. मात्र सध्या गुजरात आणि राजस्थान राज्यांतील डाळिंबाची बाजारपेठेत आवक वाढल्याने दरावर परिणाम झाला आहे.

दोन आठवड्यांत दराने केली कोंडी

उत्तर महाराष्ट्रात डाळिंब खरेदी करणारे व्यापारी व निर्यातदार गुजरात व राजस्थानमधील मालाला पसंती देत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात आवक होत असलेल्या मालाला उठाव काहीसा कमी आहे. मात्र मालाची चकाकी, आकार, रंग असल्यास शिवारखरेदीत चांगले दर अपवादात्मक मिळत आहेत.

काही शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीत तयार केलेल्या मालाची निर्यात दुबई, रशिया, बांगलादेश व नेपाळमध्ये झाली आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांत दराचा लाभ मिळाला. मात्र दोन आठवड्यांत दराने कोंडी केली आहे.

व्यापाऱ्यांच्या मते दर घसरणीचे कारणे :

- वर्षभरात डाळिंब उपलब्धता व इतर हंगामी फळांची मागणी वाढल्याने डाळिंबदरात घसरण

- गुजरात व राजस्थानमधून आवकेत वाढ व दर कमी असल्याने येथे व्यापारी व निर्यातदारांकडून खरेदीस पसंती

- दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात गुणवत्तापूर्ण मालाचा काहीसा अभाव

गेल्या तीन महिन्यांतील दरस्थिती :

महिना...किमान...कमाल...सरासरी

जानेवारी...४०...१२५...६०

फेब्रुवारी...४०...१३०...७५

मार्च...३०...१००...४५ ते ५५

आवक व दराची स्थिती : (ता. २७)

बाजार समिती...आवक (क्विंटल)...किमान...कमाल...सरासरी (दर रुपये)

राहाता...७१...१,०००...१२,५००...३,०००

पुणे...३३२...१,०००...१५,०००...८,०००

संगमनेर...३७...२,०००...१२,०००...७,०००

सांगोला...९९...३,०००...७,१००...४,५००

सटाणा...१४२...२५०...६,०००...४,६२५

सोलापूर...३६२...५००...११,०००...३,६००

सांगली...१६६...२,०००...१०,०००...६,०००

नागपूर...८०६...१,०००...६,०००...४,७५०

नाशिक...११०...३००...५,०००...३,०००

(संदर्भ : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

सध्या राजस्थान व गुजरातमधून डाळिंबाची आवक वाढली आहे. येथील डाळिंब कमी टिकवणक्षमतेची असली तरीही स्वस्त मिळत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांत डाळिंबाच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे दर चाळीस रुपयांपर्यंत खाली आले आहेत.
- रवींद्र पवार, अध्यक्ष-महाराष्ट्र राज्य डाळिंब उत्पादक व संशोधक संघ, नाशिक विभाग
डाळिंबाच्या तुलनेत सध्या द्राक्षाला मागणी वाढली आहे. यासह गुणवत्तेची डाळिंब उपलब्ध होत नसल्याने दरावर थोडा परिणाम आहे; मात्र ज्या शेतकऱ्यांकडे गुणवत्तेचा माल आहे त्यांना १०० रुपयांवर दर मिळत आहेत.
- बापू पिंगळे, संचालक-परफेक्ट मार्केट यार्ड, नाशिक
राजस्थान व गुजरात भागांत निर्यातीसाठी आवश्यक रंग व आकार असलेल्या चांगल्या मालाची खरेदी करण्यास निर्यातदारांची पसंती आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत या भागात आवक अधिक असल्याने कमी दरात डाळिंब उपलब्ध होत आहेत. त्याची खरेदी करून निर्यात होत आहे. आपल्याकडेही लागवडी वाढत असल्याने पुढील काही वर्षांत आवक वाढण्याची शक्यता आहे.
- मधुकर क्षीरसागर, संचालक-विजयश्री एक्स्पोर्ट

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Global Development Trust : ग्लोबल विकास ट्रस्टच्या कृषिकूलचे उद्घाटन

Agriculture University Promotion : कृषी विद्यापीठातील पदोन्नतीचे आदेश न काढणे कायदेशीर : आनंदकर

Agriculture University Rating : महात्मा फुले कृषी विद्यापीठाला ‘ए’ ग्रेड उत्कृष्ट मानांकन

Agriculture Department : ‘महसूल’ पाठोपाठ यंत्रणा असलेला कृषी विभाग विस्कळित

Soybean Rate : सोयाबीनच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांत संताप

SCROLL FOR NEXT