Pomegranate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Pomegranate Rate : आवक घटल्यामुळे डाळिंबाचे दर तेजीत

देशातील डाळिंबाचा मृग बहर अंतिम टप्प्यात आला आहे. यंदा गुजरात आणि राजस्थान या दोन्ही राज्यांतील डाळिबांची देशांतर्गत बाजारपेठेत आवक घटल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा डाळिंबाच्या दरात २० रुपयांनी सुधारणा झाली होती.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

सांगली ः देशातील डाळिंबाचा (Pomegranate Season) मृग बहर अंतिम टप्प्यात आला आहे. यंदा गुजरात आणि राजस्थान या दोन्ही राज्यांतील डाळिबांची देशांतर्गत बाजारपेठेत आवक (Pomegranate Arrival) घटल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा डाळिंबाच्या दरात (Pomegranate Rate) २० रुपयांनी सुधारणा झाली होती.

हंगाम अंतिम टप्प्यात आला असला, तरी डाळिंबाला प्रति किलोस १५० रुपये दर मिळत आहे. यंदाच्या हंगामात डाळिंबाच्या दरात सुधारणा झाल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

गेल्या वर्षी देशात डाळिंब उत्पादकांना राज्यात डिसेंबरअखेर पाऊस सुरू होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डाळिंबाचे नुकसान झाले होते. यंदाही परतीचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता; मात्र यंदाच्या हंगामात परतीचा पाऊस वेळेत थांबला. तसेच मॉन्सूनोत्तर पाऊसही झाला नाही.

त्यामुळे डाळिंब पिकाचे फारसे नुकसान झाले नाही. परिणामी, डाळिंबाचे दर्जेदार उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले. गेल्या दोन वर्षांपासून मृग बहरावर पावसाचे संकट ओढावले असल्याने यंदा देशात ४० ते ५० हजार हेक्टरवर डाळिंबाचा मृग बहर होता.

यंदाचा हंगाम सुरू झाल्यापासून दर्जेदार डाळिंबाला सरासरी दर १५० रुपयांपर्यंत टिकून राहिला. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला देशातील डाळिंबाचा २५ टक्क्यांपेक्षा अधिक हंगाम आटोपला होता.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात देशातील डाळिंबाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे.

वास्तविक, गेल्या दोन वर्षांत पावसामुळे डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने यंदाच्या मृग बहरातील डाळिंबाच्या क्षेत्रात पन्नास टक्क्यांनी घट झाली आहे. यामुळे देशातील डाळिंबाचा हंगाम लवकर संपेल असे डाळिंब संघाच्या सूत्रांनी सांगितले.

राजस्थान, गुजरातमध्येही क्षेत्रात वाढ

देशात डाळिंब उत्पादन घेण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहेच. परंतु राजस्थान आणि गुजरात या दोनही राज्यांत डाळिंबाच्या क्षेत्रात वाढ होत असल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षी या दोन्ही राज्यांतील डाळिंब महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील डाळिंब बाजारपेठेत विक्रीस दाखल झाली होती. त्याचा परिणाम राज्यातील डाळिंबाच्या दरावर झाला होता.

परंतु यंदा या दोन्ही राज्यांतील डाळिंबाची आवक राज्यात फारशी झाली नसल्याने डाळिंबाच्या दरात २० रुपयांनी वाढ झाली होती. त्यामुळे यंदा डाळिंबाच्या दरात तेजी राहिल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मृग बहरातील डाळिंबाचे नुकसान फारसे झाले नाही. त्यातच गुजरात आणि राजस्थानची डाळिंबाची आवक कमी होती. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासूनच डाळिंबाच्या दरात तेजी पाहायला मिळाली.

- प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT