Pomegranate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Pomegranate Price : परराज्यांतील आवकेमुळे डाळिंब दराला फटका

Pomegranate Arrival Increase : राज्यातील शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत डाळिंब साधले असतानाच आता गुजरातमधील डाळिंबाची स्थानिक बाजारपेठेत आवक वाढू लागली आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : राज्यातील शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत डाळिंब साधले असतानाच आता गुजरातमधील डाळिंबाची स्थानिक बाजारपेठेत आवक वाढू लागली आहे. त्यामुळे स्थानिक उत्पादकांना मोठा दणका बसला आहे. परिणामी, डाळिंबाच्या सुमारे दरात चाळीस टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्यातच उत्पादन खर्च वाढला असून, मिळणारा दर कमी असल्याने खर्च जाऊन मिळणारी तोकडी रक्कम हाती येत असल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

राज्यात यंदा अंदाजे ४५ हजार हेक्टरवर मृग बहराखाली क्षेत्र आहे. हंगाम धरल्यापासून पाऊस झाला. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत अतिपावसाचा फटका डाळिंबाला बसला. या दरम्यान, फुलाचे सेटिंग होण्यासाठी अडथळे निर्माण झाले होते. त्यातच सततच्या पावसामुळे तेलगट रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे २० टक्के उत्पादन कमी झाले आहे. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी काटेकोर नियोजनातून बागा साधल्या आहेत.

दरम्यान, गेल्या महिन्यापासून मृग बहरातील डाळिंबाची विक्री सुरू झाली आहे. हंगामाच्या प्रारंभीच गतवर्षीच्या तुलनेत प्रति किलोस ५ ते १० रुपयांनी दर कमी होतो. हंगामाच्या सुरुवातीला दर्जेदार डाळिंबाला १२० ते १५० रुपये असा दर होता. मात्र हे दर चांगले असल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. डाळिंबाच्या मागणीत किंचित वाढ होऊ लागली असल्याने दरही वाढतील अशी आशा होती. सद्यःस्थितीला राज्यात १५ टक्के डाळिंबाची काढणी आटोपली आहे. राज्यातील डाळिंब विक्रीच्या हंगामाला अजूनही गती आली नाही.

वास्तविक पाहता गेल्या दोन वर्षांत परराज्यांतील डाळिंबाची महाराष्ट्रासह अन्य राज्यातील बाजारपेठेत विक्रीला आली नव्हती. त्यामुळे सलग दोन वर्षे डाळिंबाला १०० ते १८० रुपये प्रति किलो असे दर मिळाले होते. सलग दोन वर्षे नैसर्गिक आपत्तीच्या संकटातही डाळिंबाला अपेक्षित दर मिळाले असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता.

गुजरातमध्ये १८ हजार हेक्टरवर डाळिंबाची लागवड आहे. त्यापैकी अंदाजे ७ हजार हेक्टरवर मृग बहर शेतकऱ्यांनी साधला आहे. राज्यातील काही भागांत पीक बरे आहे, तर काही ठिकाणी रोगाचा फटकाही बसला आहे. मात्र यंदाच्या हंगामात गुजरातमधील डाळिंब राज्यातील सोलापूर, पुणे, मुंबई येथील बाजारपेठेत दाखल झाली आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून परराज्यांतील डाळिंबाची आवक वाढली आहे. त्यामुळे डाळिंबाच्या दरात तब्बल ४० टक्क्यांनी घसरण झाली आहे. सध्या डाळिंबाला प्रति किलोस ४० ते ७० रुपये असा दर मिळत आहे. येत्या काळातही डाळिंबाची आवक वाढण्याची अंदाज डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.

राजस्थानमधील डाळिंबाचा हंगाम सुरू

राजस्थानमध्ये डाळिंबाचे क्षेत्र वाढले आहे. सद्यःस्थितीला १८ हजार हेक्टरपैकी ७ हजार हेक्टरवर मृग बहर धरला आहे. या बहरातील डाळिंबाचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे राजस्थानमधील डाळिंब विक्रीला महाराष्ट्रासह अन्य राज्यातील बाजारपेठेत येण्याचा अंदाज डाळिंब संघाने व्यक्त केला आहे. परिणामी, या राज्यातील डाळिंब विक्रीस आली, तर पुन्हा दरात घसरण होईल, अशी भीती निर्माण झाली आहे.

तीन वर्षांपूर्वीही बसला होता फटका

सन २०२१ मध्ये गुजरात आणि राजस्थान या दोन्ही परराज्यांतील डाळिंब महाराष्ट्रात दाखल झाली होती. या दरम्यान, पिन बोअर होल, अतिवृष्टी, तेलकट रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. परिणामी, उत्पादनही घटले होते. मात्र गुजरात, राजस्थान या दोन्ही राज्यांत डाळिंबाला पोषक वातावरण असल्याने पीक चांगले असल्याने या दोन्ही राज्यांतील महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील बाजारपेठेत डाळिंब विक्रीला दाखल झाली होती. त्यामुळे दरात मोठी घसरण झाली होती.

गेल्या दोन वर्षांत प्रतिकूल परिस्थितीतही डाळिंबाला चांगले दर मिळाले. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. यंदा अति पावसामुळे डाळिंब संकटात असतानाही शेतकऱ्यांनी डाळिंब बागा साधल्या. मात्र परराज्यांतील डाळिंब विक्रीसाठी महाराष्ट्रात आली आहेत. त्याचा फटका राज्यातील डाळिंबाच्या दरावर झाला आहे.
प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ
अति पाऊस आणि परतीचा पाऊस यामुळे अगोदर डाळिंबाचे उत्पादन घटले आहे. डाळिंब उत्पादन खर्चही वाढला आहे. त्यातच आता इतर राज्यांतील डाळिंब विक्रीला आल्याने दर कमी झाल्याने डाळिंबातून मिळणाऱ्या पैशातून आर्थिक गणित बसवणे कठीण होईल.
विजय मरगळे, डाळिंब उत्पादक शेतकरी, तडवळे, जि. सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT