Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

Global Demand for Pomegranates : डाळिंब पीक नैसर्गिक संकटात असतानाही डाळिंब निर्यात करण्यासाठी शेतकरी पुढे येत असल्याचे चित्र आहे. यंदा डाळिंब निर्यातीसाठी नोंदणी सुरू झाली आहे.
Pomegranate
PomegranateAgrowon
Published on
Updated on

Sangli News : डाळिंब पीक नैसर्गिक संकटात असतानाही डाळिंब निर्यात करण्यासाठी शेतकरी पुढे येत असल्याचे चित्र आहे. यंदा डाळिंब निर्यातीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. राज्यातून आजअखेर २१ हजार २१५ डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. या वर्षीही डाळिंबाची निर्यात वाढेल, अशी शक्यता डाळिंब उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.

राज्यातील गेल्या तीन वर्षांपासून डाळिंब नैसर्गिक आपत्तीमुळे धोक्यात आले आहे. परिणामी, डाळिंबाच्या उत्पादनातही काही प्रमाणात घट झाली. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत डाळिंबाला अपेक्षित दर मिळत आहे. अशा परिस्थितीतही राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी डाळिंबाची निर्यात करण्यासाठी पुढे येत आहेत.

Pomegranate
Pomegranate Farming : यंदा दोन्ही बहरांचे नियोजन करतोय!

गतवर्षी डाळिंबाची निर्यात वाढली आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना दिसाला मिळाला आहे. देशातून सर्वाधिक डाळिंब निर्यात महाराष्ट्रातून होते. राज्यातून प्रामुख्याने युरोपियन देश, सौदी अरेबिया, श्रीलंका, आणि थायलंड यासह बांगलादेश, नेपाळ नेदरलॅंड या देशात डाळिंबाची निर्यात केली जाते.

यंदा डाळिंबाला पाणीटंचाई, आणि अतिपावसाचा फटका बसला आहे. परिणामी डाळिंबाला पोषक वातावरण नसल्याने सेटिंग होण्यास अडथळे निर्माण झाले होते. त्यातूनही शेतकऱ्यांनी काटेकोर नियोजन करत डाळिंब बागा साधल्या आहेत. यंदा डाळिंब निर्यात करण्यासाठी नोंदणी सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी नोंदणी करू लागले आहेत. आतापर्यंत २१ हजार २१५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. सर्वाधिक नोंदणी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली, तर त्या खालोखाल सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नोंद केली आहे.

Pomegranate
Pomegranate Export : डाळिंब निर्यात सुसाट ; ४५ देशात पोहोचला भारतीय डाळिंबाची गोडवा

देशातून निर्यात वाढण्याची शक्यता

गतवर्षी देशातून डाळिंबाची ७२ हजार ११ टनांनी झाली होती. अर्थात, दोन वर्षांपेक्षा गतवर्षी ९ हजार टनांनी निर्यात वाढली होती. परदेशातून डाळिंबाची मागणीत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे यंदा प्रतिकूल परिस्थितीही यंदाच्या वर्षीही डाळिंबाची निर्यात वाढेल, असा अंदाज डाळिंब उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

देशातील महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांतूनही डाळिंबाची निर्यात होते. यंदाच्या हंगामात या राज्यातील शेतकरीही निर्यातीसाठी पुढे आले आहेत. आंध्र प्रदेश ९, गुजरात २, कर्नाटक ८ आणि तेलंगणा २१ असे एकूण या चार राज्यांतील ४० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

जिल्हानिहाय डाळिंब निर्यातीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी

जिल्हा............नूतनीकरण........नवीन......एकूण

अहिल्यानगर........१३०५...२४०७...३७१२

बुलडाणा....२....१...३

नाशिक....२२....६२०...६४२

पुणे....२२५...११५०....१३७५

सांगली...१५५६....६५८...२२१४

सोलापूर....५५५३....७७०३...१३२५६

ठाणे....००...३...३

एकूण...८६६६...१२५४९....२१२१५

प्रतिकूल परिस्थितीत डाळिंब उत्पादक शेतकरी निर्यातीसाठी पुढे येत आहेत ही बाब चांगली आहे. त्यामुळेच यंदाही शेतकऱ्यांनी डाळिंब निर्यातीसाठी चांगली नोंदणी केली असून निर्यात वाढेल अशी आशा आहे.
प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com