pomegranate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Pomegranate : सोलापुरात डाळिंबाचे दर पुन्हा वधारले

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात डाळिंबाची आवक तुलनेने कमीच राहिली. पण मागणी असल्याने डाळिंबाचे दर पुन्हा वधारले.

सुदर्शन सुतार

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात डाळिंबाची आवक (Pomegranate Arrival) तुलनेने कमीच राहिली. पण मागणी असल्याने डाळिंबाचे दर (Pomegranate Rate) पुन्हा वधारले. डाळिंबाला प्रतिक्विंटलला सर्वाधिक १६ हजार हजार रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात डाळिंबाची आवक प्रतिदिन एक ते दोन टनांपर्यंत राहिली. एरवी ही आवक चार ते पाच टनांपर्यंत असते. मंगळवेढा, सांगोला, माढा, मोहोळ या स्थानिक भागांतूनच सर्वाधिक डाळिंबाची आवक राहिली. पण गेल्या काही दिवसांत त्याच्या आवकेत सातत्याने घट होत आहे. सध्या पाऊस आणि वातावरण बदलाचा डाळिंबाच्या दर्जावर परिणाम झाला आहे. त्यातच आधीच खोडकिडीमुळे क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे डाळिंबाची बाजारातील आवक कमी होत आहे. पण दुसरीकडे मागणीही वाढते आहे. त्यामुळे डाळिंबाचे दर वाढले आहेत.

गत सप्ताहात डाळिंबाच्या दरात चांगलीच वाढ झाली. डाळिंबाला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी ४००० रुपये आणि कमाल १६ हजार रुपये दर मिळाला. त्याशिवाय हिरवी मिरची, टोमॅटो, कोबीचे दर काहीसे स्थिर राहिले. त्यांची आवक रोज प्रत्येकी ३० ते २०० क्विंटलपर्यंत झाली. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला किमान २५०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि कमाल ४५०० रुपये, टोमॅटोला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी ७०० रुपये आणि कमाल १५०० रुपये, कोबीला किमान ५०० रुपये, सरासरी ९०० रुपये आणि कमाल १२०० रुपये दर मिळाला. कोथिंबीर, मेथी, शेपूला बऱ्यापैकी उठाव मिळाला. या भाज्यांची आवक रोज १० ते १५ हजार पेंढ्यांपर्यंत राहिली. कोथिंबिरीला प्रतिशंभर पेंढ्याला ९०० ते १२०० रुपये, मेथीला १००० ते १५०० रुपये आणि शेपूला ५०० ते ७०० रुपये असा दर मिळाला.

लिंबू, काकडीचे दरही तेजीत

लिंबू आणि काकडीचे दर या सप्ताहात चांगलेच तेजीत राहिले. त्यांची आवक स्थानिक भागातूनच झाली. लिंबूची रोज १० ते २० क्विंटल आणि काकडीची दोन ते पाच क्विंटल अशी आवक राहिली. त्यांना मागणीही चांगली राहिली. लिंबूला प्रतिक्विंटलला किमान १५०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि कमाल ४००० रुपये तर काकडीला किमान ६०० रुपये, कमाल ५५०० रुपये आणि सरासरी ३००० रुपये असा दर मिळाल्याचे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Heat Wave: विदर्भात उष्णतेची लाट; विदर्भात शनिवारपासून काही भागात वादळी पावसाचा अंदाज

सोनसवाडी शिवार नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत समाविष्ट करा

Jalna Nanded Highway: जालना-नांदेड महामार्गाचे भूसंपादन तातडीने पूर्ण करा

Bacchu Kadu Joins Shiv Sena: बच्चू कडूंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर

Soytbean Rate: सोयाबीनचा ६ हजारांचा टप्पा पार

SCROLL FOR NEXT