Pomegranate : झाडांची आंतरिक शक्ती वाढविल्यास रोग कमी

डाळिंब पिकावरील तेल्या रोगाचे व्यवस्थापन हे रोग आल्यावर न करता त्या अगोदरच केले पाहिजे.
pomegranate
pomegranateAgrowon

निमगाव केतकी, ता. इंदापूर ः ‘‘डाळिंब पिकावरील (Pomegranate) तेल्या रोगाचे व्यवस्थापन (Pomegranate Disease Management) हे रोग आल्यावर न करता त्या अगोदरच केले पाहिजे. पिकाचा बहार यशस्वी करण्यासाठी खते व औषधांची मात्रा ही कृषी विद्यापीठाने (Recommendation Of Agriculture University)) केलेल्या शिफारशीप्रमाणे करावी,’’ अशी माहिती गणेशखिंड येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. विनय सुपे यांनी दिली.

pomegranate
Pomegranate : डाळिंबाचे आरोग्यदायी महत्त्व

वरकुटे खुर्द (ता. इंदापूर) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत पीक उत्पादन खर्च योजना, कृषी अर्थशास्त्र विभाग, ग्रामपंचायत वरकुटे खुर्द व वरकुटे सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी परिसंवादाचे आयोजन केले होते. सुधारित डाळिंब लागवड तंत्रज्ञान आणि कीड व रोग व्यवस्थापन या विषयावर डॉ. सुपे मार्गदर्शन करताना बोलत होते.

pomegranate
pomegranate: डाळिंबातील सूत्रकृमी व्यवस्थापन

या परिसंवादाचे उद्‍घाटन सरपंच बापूराव शेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रूपनवर, महादेव शेंडे, डॉ. अरुण गवळी, डॉ. राजेंद्र हिले, डॉ. कुंडलिक जाधव, डॉ. स्वाती चौधरी, मंडल अधिकारी जी. पी. सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. सुपे म्हणाले, ‘‘झाडांची आंतरिक शक्ती वाढवली तर रोग कमी येतील. पानांचा आकार मोठा असला पाहिजे. झाडांची शरीरक्रिया कळली पाहिजे. आपल्या जमिनीचा अभ्यास असला पाहिजे. चुकीच्या गोष्टींचा वापर टाळला तरच उत्पादन खर्चात बचत होईल.’’

कृषी सहायक एम. डी. जाधव, नवनाथ बोराटे, एस. एल. लोणार, ए. एम. डुबल, एस. जे. लोणकर व एस. एस. शिंदे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com