pomegranate Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Pomegranate Rate: सोलापुरात डाळिंबाला उठाव, दरही तेजीतच

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात डाळिंबाच्या आवकेत घट झाली, पण मागणीमुळे दरातही पुन्हा वाढ झाली.

सुदर्शन सुतार

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Market Committee) आवारात गतसप्ताहात डाळिंबाच्या (Pomegranate Market) आवकेत घट झाली, पण मागणीमुळे दरातही पुन्हा वाढ झाली. डाळिंबाला प्रतिक्विंटलला सर्वाधिक १७ हजाऱ रुपये इतका दर मिळाल्याचे सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात डाळिंबाची आवक रोज ३०० ते ५०० क्विंटल इतकी जेमतेम राहिली. आवक कमी आणि मागणी जास्त, अशी काहीशी परिस्थिती राहिल्याने डाळिंबाला पुन्हा उठाव मिळाला. त्याचे दरही एकदम वाढले. गेल्या काही महिन्यांपासून डाळिंबाच्या दरात चांगलीच सुधारणा आहे.

या सप्ताहात पुन्हा त्यात दर वाढलेलेच राहिले. डाळिंबाची सर्व आवक स्थानिक भागातूनच झाली. डाळिंबाला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी ५५०० रुपये आणि सर्वाधिक १७ हजार रुपये इतका दर मिळाला. त्याशिवाय कारली, वांगी, सिमला मिरची यांचे दर काहीसे स्थिर आणि टिकून राहिले. त्यात कारली आणि सिमला मिरचीची आवक रोज १० ते १५ क्विंटलपर्यंत तर वांग्याची ६० ते १०० क्विंटलपर्यंत राहिली. सिमला मिरचीला प्रतिक्विंटलला किमान १८०० रुपये, सरासरी २५०० रुपये, वांग्याला किमान १५०० रुपये, असा दर मिळाला.

कांद्याचे दर टिकून

कांद्याची आवकेत या सप्ताहात पुन्हा चढ-उतार राहिला. कांद्याची आवक रोज १०० ते १५० गाड्यापर्यंत राहिली. पण कांद्याला मागणी चांगली राहिली. त्यामुळे दर टिकून राहिले. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये असा दर मिळाल्याचे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Diversification: पीक पद्धतीत बदलाचा अभाव

Forest Rights Act: वनहक्क कायद्याच्या बळावर ग्रामसभा स्वावलंबी

Climate Smart Farming: हवामान बदलानुसार शेतीचे योग्य व्यवस्थापन करा

Raju Shetti: कर्जमाफीत आकड्यांचा जुगाड, राजू शेट्टींची जोरदार टीका, ७ मुद्दे केले उपस्थित

Water levels Drop: लघू प्रकल्पांत दोन टक्के,तर मध्यम प्रकल्पांत तीन टक्के घट

SCROLL FOR NEXT