गोपाल हागे
अकोला जिल्ह्यात बिगर मोसमी टरबूज-खरबूज पिकवण्यात काही शेतकऱ्यांनी हातखंडा निर्माण केला.
तेल्हारा तालुक्यातील चितलवाडी गावात अशा प्रकारची लागवड रूजवण्यात अनिल इंगळे यांचा मोठा वाटा आहे. सातत्याने या पिकांमध्ये ते प्रयोग करीत असतात.
काही दिवसांआधी त्यांनी आॅफसीजन टरबूज पिकवले. प्रतिकिलो १७ रुपयांचा जागेवरच दर मिळाला. आता तीन एकरात खरबूज लागवड केली असून वेलांना क्रॉप कव्हर टाकले आहे.
यामुळे किड-रोगांना पायबंद घातलानाच पिकाची निकोप वाढ होण्यास मदत होते, असे ते सांगतात. यासाठी अतिरीक्त खर्च लागत असला तरी येणारे उत्पादन, फळांचा दर्जा चांगला राहल्याने दरांमधून खर्च निघून येतो.