Tur Procurement Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Procurement : तूर खरेदीचा साडेपाच लाख क्विंटलचा टप्पा पार

TUr Market : राज्यातील शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी केंद्र शासनाच्या नाफेड संस्थेमार्फत हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत यंदा महाराष्ट्रात तूर खरेदीने साडेपाच लाख क्विंटल खरेदीचा टप्पा गाठला आहे.

Team Agrowon

Akola News : राज्यातील शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी केंद्र शासनाच्या नाफेड संस्थेमार्फत हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत यंदा महाराष्ट्रात तूर खरेदीने साडेपाच लाख क्विंटल खरेदीचा टप्पा गाठला आहे. सध्या पर्यंत राज्यात ५.५ लाख क्विंटलहून अधिक तूर हमीभावाने खरेदी करण्यात आली आहे. दुसरीकडे नोंदणीसाठी मुदत वाढवत बुधवार (ता.३०) पर्यंत करण्यात आली आहे.

यंदाच्या हंगामात तुरीचे दर दबावात आहेत. बाजारपेठेत तूर किमान ६४००, कमाल ७२४५ तर सरासरी ७००० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होत आहे. अशा स्थितीत केंद्राचा हमीभाव ७ हजार ५५० रुपये असल्याने शासकीय खरेदीला प्रतिसादाची अपेक्षा केली जात होती. मात्र, ही खरेदी संथगतिने होत आहे. शेतकरी हमीभाव केंद्रावर तूर नेण्याऐवजी बाजारपेठांमध्ये नेत विक्री करीत आहेत.

हमीभावाने शुक्रवार पर्यंत नाफेडने चार लाख २८ हजार क्विंटल तर एससीसीएफने १ लाख २४२६९ क्विंटल खरेदी केली होती. नाफेडच्या खरेदी पणन विभागाच्या केंद्रावर सर्वाधिक दोन लाख २४७४ क्विंटल खरेदी झाली.

याशिवाय विदर्भ मार्केटींग फेडरेशनने एक लाख ५३७६, पृथाशक्ती ६३६५६, महाकिसान वृद्धी २८८९७, महाकिसान संघ २४६००, तर महा मराठवाडाच्या खरेदी केंद्रावर १५८७ क्‍विंटल तुरीचा समावेश आहे.

नाफेडकडे ९२८०५ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली असून त्यापैकी २७५२८ शेतकऱ्यांची तूर खरेदी झाली. एनसीसीएफने केलेल्या खरेदीत महाकिसान संघाने ४९४७६ क्विंटल, पृथाशक्तीने ४३७७० क्विंटल, पणन विभागाच्या केंद्रावर १९८८७, विदर्भ मार्केटींग फेडरेशन ४२११, महाकिसान वृद्धी ३१८९ आणि गतिशील कृषीकल्याण फेडरेशनाच्या केंद्रावर ३७३४ क्विंटल तूर खरेदी आजवर झाली आहे. केंद्राने एकूण १३.२२ लाख टन तूर खरेदीला मंजुरी दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lumpy Skin : लातूर जिल्ह्यात बारा गावांत ‘लम्पी’चा प्रादुर्भाव

Warna Dam : वारणा धरणपाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला

Radhanagari Dam : कोल्हापुरात जोरदार पाऊस,'राधानगरी'चे चार दरवाजे उघडले

Tur Crop : खानदेशात तूर पीक जोमात

E-Peek Pahani : शेतकऱ्यांचा ई-पीक पाहणीला कमी प्रतिसाद

SCROLL FOR NEXT