Onion Market Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Market Rate : नाफेडच्या विक्रीनंतरही ३ कारणांनी कांदा वाढणार; नाफेडची देशभरात कांद्याची ३५ रुपये किलोने थेट ग्राहकांना विक्री

Anil Jadhao 

Pune News : सरकारने स्टाॅकमधला कांदा बाजारात विक्रीसाठी काढला. सरकारच्या या निर्णयामुळे बाजारात कांद्याचे भाव ४०० रुपयांपर्यंत नरमले.पण कांद्याच्या भावात मोठी पडझड होण्याची शक्यता दिसत नाही. कारण नाफेडकडे जेवढा कांदा आहे तो कांदा पूर्ण देशाला १० दिवसही पुरणार नाही. तसेच सध्या देशात उपलब्ध कांद्याचा स्टाॅकही कमी आहे आणि खरिपातील कांद्याचेही नुकसान होत आहे. यामुळे केवळ नाफेडच्या कांदा विक्रीमुळे बाजारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता कमीच आहे. फक्त गरज आहे पॅनिक सेलिंग टाळण्याची आणि टप्प्याटप्प्याने कांदा विकण्याची.

मागील दोन दिवसांमध्ये देशभरातील बाजारांमध्ये कांदा आवक जास्त आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील आवक महाराष्ट्राच्या तुलनेत अधिक आहे. याचा दबाव दरावर वाढला. परिणामी भावात मागील दोन दिवसांमध्ये क्विंटलमागे ४०० रुपयांपर्यंत नरमाई आली. कांद्याचा सरासरी भाव ४ हजार ते ४ हजार ३०० रुपयांपासून कमी होऊन आज ३ हजार ४०० ते ३ हजार ९०० रुपयांपर्यंत आला. विशेष म्हणजे नाफेड आणि एसीसीएफने विक्रीसाठी केंद्रे सुरु केल्यानंतर बाजारात पॅनिक सेलिंग सुरु झाले आहे. नाफेडच्या कांद्यापेक्षा पॅनिक सेलिंगचा दबाव कांद्यावर जास्त आला, असे कांदा बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

सरकारकडे सध्या कांद्याचा स्टाॅक पावणे पाच लाख टन असल्याचे सांगितले जाते. पण सरकारकडे म्हणजेच नाफेड आणि एनसीसीएफकडे एवढा स्टाॅकच नाही, अशी माहीती अभ्यासकांनी दिली. काहीजणांच्या मते नाफेड आणि एनसीसीएफकडे ३ ते ३.५ लाख टनांचा स्टाॅक असू शकतो तर काही जणांच्या मते २.५ लाख टनांपेक्षा जास्त स्टाॅक नसवा. कारण या दोन्ही संस्थांकडे कोणत्या केंद्रांवर किती स्टाॅक उपलब्ध आहे, याची आकडेवारी उपलब्ध नाही. त्यामुळे नाफेड आणि एनसीसीएफकडे नेमका स्टाॅक किती? सरकार सांगते तेवढा आहे का? हा मुळ प्रश्न आहे.

समजा सरकार म्हणते त्याप्रमाणे पावणे पाच लाख टन कांदा आहे. हा कांद्याची सरकार आता किरकोळ विक्री करत आहे. देशाचा विचार केला तर रोज ५० ते ५५ हजार टन कांदा लागतो. म्हणजेच देशभरात दिवसाला ५० ते ५५ हजार टन कांदा खाल्ला जातो. आता सरकार म्हणते तेवढा कांदा स्टाॅकमध्ये असेल तर हा कांदा देशाला १० दिवसही पुरणार नाही. मात्र बाजारात चर्चा आहे तेवढा कांदा असेल तर ५ ते ७ दिवस पुरेल.

मुळात कांदा भाव बाजारातील आवक कमी झाल्यामुळे वाढले होते. कारण यंदा कांदा उत्पादन घटले होते. त्यामुळे सध्या उपलब्ध स्टाॅकही कमी आहे. देशात कांद्याचा स्टाॅक सरासरीपेक्षा कमी आहे. त्यातही मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील स्टाॅक २० टक्क्यांपर्यंत असल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले. तर महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत कांद्याचा स्टाॅक काहीसा अधिक आहे. पण महाराष्ट्रातील साठाही दरवर्षी सप्टेंबर महिन्यात असतो त्या तुलनेत खूपच कमी आहे. 

सध्या उपलब्ध स्टाॅकपैकी जास्त स्टाॅक व्यापाऱ्यांकडे आहे. पुढच्या दोन-तीन आठवड्यांमध्ये शेतकऱ्यांकडील स्टाॅक आणखी कमी होईल. कांद्याचा जास्तीत जास्त स्टाॅक व्यापाऱ्यांच्या हाती जाईल. व्यापारी नव्या मालाची बाजारात आवक वाढेपर्यंत तेजी मंदी करत राहणार. म्हणजेच नाफेडने कांदा विक्री केली तरी तेवढ्यापुरता बाजारावर परिणाम होऊ शकतो. पण सध्यातरी कांदा बाजारात कायमस्वरुपी मंदीचे चित्र दिसत नाही, असे अभ्यासकांनी सांगितले. 

त्यामुळे कांद्याचे पॅनिक सेलिंग टाळून टप्प्याटप्प्याने विक्री केल्यास फायदेशीर ठरू शकते, असेही अभ्यासकांनी सांगितले. यापुढेही बाजारात व्यापाऱ्यांची तेजी-मंदी, नाफेडची कांदा विक्री आणि सरकारचे धोरण यामुळे दरात चढ उतार राहू शकतात. पण शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग टाळून दिवाळीपर्यंत कांदा विक्रीचे नियोजन केल्यास फायदेशीर ठरेल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुका तीन टप्प्यांत

Budget Update : अर्थसंकल्पातून प्रत्येक समाज घटकाला न्याय : अजित पवार

Watershed Mismanagement Case : पाणलोट गैरव्यवहारप्रकरणी फौजदारी कारवाई करा

Vegetable Market : गोव्यातील विक्री केंद्रे खरेदी करणार महाराष्ट्रातील भाजीपाला, फळे

Climate Change : तापमानवाढीचा शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका : मुख्यमंत्री शिंदे

SCROLL FOR NEXT