Onion Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Market : शिरूर तालुक्यात कांदा खरेदी केंद्र सुरू होणार

पुणे जिल्ह्यातील पहिले नाफेड कांदा खरेदी केंद्र शिरूर तालुक्यात लवकरच सुरू होणार आहे.

Team Agrowon

Onion Market Update रांजणगाव गणपती : ‘‘पुणे जिल्ह्यातील पहिले नाफेड कांदा खरेदी केंद्र (Onion Procurement Center) शिरूर तालुक्यात लवकरच सुरू होणार आहे. शिरूर तालुक्याबरोबर पारनेर, श्रीगोंदे, खेड, दौंड या तालुक्यातील कांदा उत्पादकांना (Onion Farmer) याचा फायदा होईल,’’ असे भाजपच्या उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी सांगितले.

शिरूर तालुक्यात नाफेड कांदा खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी पाचंगे यांनी निवेदनाद्वारे केली होती. त्यानंतर शिरूर बाजार समितीने नाफेडकडे शिरूर, पिंपळे जगताप, पाबळ येथे केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव दिला. जिल्ह्यात शिरूर तालुका हा सर्वात जास्त कांदा उत्पादन करणारा आहे. यावर्षी शिरूर तालुक्यात साधारण १५५६१ हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे.

नाशिक जिल्हात नाफेड केंद्र सुरू होण्याअगोदर कांद्याला ४५० बाजारभाव मिळत होता, नाफेड केंद्र सुरू झाल्यानंतर ९५० पर्यंत बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे शिरूर तालुक्यात नाफेड कांदा खरेदी केंद्र सुरू झाले तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

व्यापाऱ्यांच्या मनमानीला आळा बसेल. शिरूर बाजार समितीचे प्रभारी शंकर कुंभार यांनी तातडीने नाफेडकडे शिरूर, पिंपळे जगताप, पाबळ येथे नाफेड कांदा खरेदी केंद्र सुरू करावे, असा प्रस्ताव दाखल केला आहे.

शिरूर बाजार समितीत कांदा व इतर शेतीमालाला योग्य भाव दिला जात नाही. त्यामुळे इतर ठिकाणी शेतीमाल विक्रीस न्यावा लागत आहे, अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या आहेत. शेतकऱ्यांनी आपली फसवणूक होत असेल तर आमच्याशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन पाचंगे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tractor Heating in Summer: उन्हाळ्यात ट्रॅक्टर गरम होतोय? देखभालीच्या सोप्या ७ टिप्स!

Power Supply Issues: धान पिकाला विजेचा फटका

Weekly Market Issue: धाड आठवडी बाजार प्रश्नावर आंदोलनानंतर प्रशासनाचे आश्वासन

Flood Fishermen Compensation: पूरग्रस्त मत्स्य व्यावसायिकांना चार कोटींची भरपाई मंजूर

CPIM Protest: बीड जिल्ह्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने

SCROLL FOR NEXT