Onion Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Market : बाजारात कांद्याच्या दरात घसरण सुरूच

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे; पण येणाऱ्या मालाला उठाव नसल्याने बाजारभाव उतरले आहेत.

Team Agrowon

Onion Market Update वाशी ः मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे; पण येणाऱ्या मालाला उठाव नसल्याने बाजारभाव उतरले आहेत. त्यामुळे महिनाभरापूर्वी १३ ते १४ रुपये किलो दराने विकला जाणारा नवीन कांदा सध्या ८ ते १० रुपये किलोने विकला जात आहे.

एपीएमसीत डिसेंबर, जानेवारीत नवीन कांद्याची अधिक आवक होत असते; परंतु अवकाळी पावसाने उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे जुन्या साठवणुकीचा कांदा भिजल्याने खराब झाला होता.

त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीसाठी बाहेर काढण्यात आला आहे. परिणामी, बाजारात काद्यांचे आवक वाढल्याने दर गडगडले आहेत. मंगळवारी बाजारात १२० गाड्या दाखल झाल्या; परंतु पुरवठ्याच्या तुलनेत उठाव कमी असल्याने दरात घसरण सुरूच आहे.

सध्याचे दर

सध्या बाजारात मोठ्या आकाराचा कांदा ९ ते ११ रुपये किलो, तर एक आणि दोन नंबरचा कांदा ७ ते ९ रुपये किलो आणि पाल्याचा कांदा ३ ते ४ रुपये किलोने विक्री होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT