Onion Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Market News : नगर बाजार समितीत कांद्याला ५०० ते ४२०० रुपयांचा दर

Onion Rate : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात सुधारणा होत आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात सुधारणा होत आहे. सोमवारी (ता. १६) झालेल्या लिलावात कमाल दर ३८०० रुपये क्विंटलपर्यंत मिळाला होता. गुरुवारी (ता. १९) झालेल्या लिलावात कमाल दर ४२०० रुपयापर्यंत मिळाला. गेल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पहिल्यांदाच बाजारात कांदादरात सुधारणा दिसू लागली आहे.

नगर जिल्ह्यात दरवर्षी कांद्याची वर्षभरात साधारणपणे २ लाख हेक्टरपर्यंत लागवड होत असते. यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे कांदा क्षेत्रात काहीशी घट होणार असली तरी पाणी उपलब्ध असलेल्या भागात शेतकरी कांदा लागवड करणारच आहेत असे दिसतेय. मागील वर्षभरापासून कांद्याला दर नाही.

काही महिन्यापूर्वी कांदादर वााढू लागताच निर्यात शुल्क लागू झाल्याने दरात पुन्हा घसरण झाली. त्यानंतर चार महिन्यांपासून कांदादर अडीच हजारांवर स्थिर होते. मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा कांद्याला मोठा फटका बसला. साठवण करून ठेवलेला कांदा फार दिवस टिकला नाही.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नासाडी झाल्याने यंदा कांदा उत्पादकांना आर्थिक फटका सोसावा लागला आहे. यंदा पहिल्यांदाच कांदा दरात काहीशी सुधारणा होताना दिसत आहे. गेल्या आठ दिवसापासून कांदा दरात सुधारणा होत असून अडीच हजारांवर स्थिर असलेला कांदा गुरुवारच्या लिलावात किमान ५०० ते कमाल ४२०० रुपयांपर्यंत गेला असून सरासरी ३५०० रुपयांपर्यंत दर मिळाला.

सोमवारी (ता. १६) झालेल्या लिलावात चांगल्या दर्जाच्या कांदाला ३८०० रुपयांपर्यंत तर सरासरी २७०० रुपये दर मिळाला होता. बाजारात गावरान कांद्याची आवक कमी झाली आहे.

नगर बाजार समितीत साधारणपणे दर लिलावाला ८० हजार ते एक लाख गोण्यापर्यंत आवक होत असते. सध्या मात्र आवक कमी झाली असून दर लिलावाला ४० ते ४५ हजार गोण्यापर्यंत आवक होत आहे. पावसाळी लाल कांद्याचीही आवक वाढू लागली आहे. याच दरम्याण लाल कांद्यालाही दर मिळत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT