Onion Market News : अंतिम टप्प्यात उन्हाळ कांदादरात सुधारणा

Onion Rate : चालू वर्षी एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत विक्री झालेल्या उन्हाळ कांद्याचा उत्पादन खर्चही वसूल झालेला नाही. त्यात ऑगस्टपासून आवक कमी झाल्याने दरात सुधारणा दिसून आली.
Onion Market
Onion MarketAgrowon
Published on
Updated on

Nashik News : चालू वर्षी एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत विक्री झालेल्या उन्हाळ कांद्याचा उत्पादन खर्चही वसूल झालेला नाही. त्यात ऑगस्टपासून आवक कमी झाल्याने दरात सुधारणा दिसून आली. मात्र केंद्र सरकारने ४० टक्के कांदा निर्यात शुल्क लावून अप्रत्यक्ष निर्यातबंदी केली.

त्यातच व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवल्याने कांद्याची सड वाढली. आता कांदासाठा संपुष्टात येत असून दैनंदिन आवक घटल्याने चालू सप्ताहात प्रतिक्विंटल दर ३ हजारांवर पोहोचले. प्रत्यक्षात काही शेतकऱ्यांच्या चाळीतील कांदा सडला, तर काहींनी बाहेर फेकला. त्यामुळे दराचा फायदा तुरळक शेतकऱ्यांना होत आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात उन्हाळ कांद्याच्या दरात वाढ झाली.

Onion Market
Onion Market News : ‘एनसीसीएफ’ची कांदा खरेदी जाहिरातीपुरतीच

नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा सटाणा, कळवण, देवळा, चांदवड, नांदगाव, मालेगाव, येवला, सिन्नर, निफाड व दिंडोरी या तालुक्यांतील झालेली कांदा सड व दरातील घसरण यामुळे मोठे नुकसान झाले. लागवडीच्या एकूण क्षेत्रापैकी ३५ हजारांहून अधिक क्षेत्र बाधित झाले. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवला.

मात्र एप्रिलपासून ते ऑगस्टपर्यंत दरात सुधारणा नव्हती. ऑगस्टच्या मध्यात कांदा आवक कमी होऊ लागल्याने दरात सुधारणा झाली. केंद्र सरकारने निर्यात शुल्क लागू करून दरवाढीवर नियंत्रण आणले. त्यामुळे निर्यात घटून शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले.

Onion Market
Onion Market : कांद्याचा वांदा कसा सोडवता येईल?

सध्या आवक कमी झाल्याने ऑक्टोबरच्या तिसऱ्या सप्ताहात सरासरी दर ३ हजार रुपयांवर पोहोचले. मात्र आता कांदा शिल्लक नसल्याने शेतकऱ्यांना दरवाढीचा फायदा मिळाला नाही. पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या शरदचंद्र पवार मुख्य बाजारात कांद्याला प्रतिक्विंटल उच्चांकी ३९६० रुपये दर मिळाला. तर उच्चांकी सरासरी ३४५० रुपये दर लासलगाव समितीच्या विंचूर उपबाजारात मिळाला.

कांदा दरस्थिती :(दर रुपयांत ः ता. १८ ऑक्टोबर)

बाजार समिती आवक (क्विंटल) किमान कमाल सरासरी

लासलगाव ८,२०० १,५५१ ३,६११ ३,३०१

पिंपळगाव बसवंत १३,५०० १,६०० ३,९६० ३,४००

नामपूर १२,००० १,००० ३,६०० ३,२००

उमराणे ९,५०० ५५० ३,५६१ ३,२५०

चांदवड ११,००० १,५०० ४,००० ३,१८०

देवळा ८,५५० ४५० ३,५०० ३,२००

येवला ५,००० १,००० ३,७२५ ३,१५०

मुंगसे(मालेगाव) ११,००० ९०० ३,५०२ ३,१००

मनमाड ३,००० ६०० ३,४६० ३,१००

(संदर्भ : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com