Onion Market  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Market : कांद्याचा भाव पुन्हा उत्पादन खर्चापेक्षा कमी; भावातील घसरण सुरुच

Onion Rate : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्यानंतर भावात घसरण सुरु झाली होती. भावातील ही घसरण आजही सुरुच आहे. कांद्याचा भाव आता उत्पादन खर्चापेक्षा कमी झाला. शेतकऱ्यांना आता तोट्यात कांदा विकावा लागत आहे.

Anil Jadhao 

Pune News : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्यानंतर भावात घसरण सुरु झाली होती. भावातील ही घसरण आजही सुरुच आहे. कांद्याचा भाव आता उत्पादन खर्चापेक्षा कमी झाला. शेतकऱ्यांना आता तोट्यात कांदा विकावा लागत आहे, असे शेतकऱ्यांना सांगितले. 

सरकारने ८ डिसेंबर रोजी कांदा निर्यातबंदी करण्याआधी कांद्याचा सरासरी भाव ३ हजार ५००  ते ४ हजार रुपये होता. पण सरकारने कांदा निर्यातबंदी केली आणि कांदा भाव कमी होण्यास सुरुवात झाली. कांद्याचे भाव डिसेंबरच्या शेवटी २ हजारांवर आले होते. म्हणजे दरात किमान १५०० ते २ हजारांची घट झाली होती. त्यावेळी कांदा बाजारात स्थिरावेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण प्रत्यक्षात कांद्याचा बाजार पुन्हा दबावात आला. 

जानेवारीची सुरुवात झालील तेव्हा म्हणजेच नविन वर्षाच्या सुरुवातीला कांद्याचा भाव सरासरी १ हजार ८०० ते २ हजारांच्या दरम्यान होता. हा भाव कमी होत दुसऱ्या आठवड्यात १ हजार ५०० ते १ हजार ७०० रुपयांवर आला. पण शेवटच्या आठवड्यात कांदा भावातील घट जास्त वाढली. कांद्याचा भाव मागच्या आठवडाभरात रोज कमी होत गेला. रोजची दरातील घट क्विंटलमागं किमान ५० ते १०० रुपयांच्या दरम्यान राहीली. 

काय भाव मिळतोय?

कांद्याचा भाव आता देशातील बाजारात सरासरी १ हजार ते १ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान पोचला. शेतकरी सांगतात की कांदा उत्पादन खर्चच क्विंटललाल १२०० रुपयांपर्यंत येतो. त्यामुळे कांदा आता खर्चालाही परवडत नाही. चिंगळी कांदा आणि कमी गुणवत्तेचा कांदा कमी भावातच विकला जात आहे. किमान भाव अगदी १०० रुपयांपासून सुरु झाला. 

ही वेळ का आली?

वाढत्या लाल कांद्याची आवक आणि निर्यातबंदी यामुळे भाव पडल्याचे व्यापारी आणि शेतकऱ्यांनी सांगितले. खरिपातील कांद्याची नेमकी लागवड किती आणि दुष्काळामुळे उत्पादकता किती कमी होईल, याचा अंदाज सरकारलाही आला नाही. उत्पादन कमी राहील असा अंदाज बांधून सरकारने निर्यातबंदी केली. पण प्रत्यक्षात कांद्याचे उत्पादन चांगले दिसते. आवकही जास्त आहे. यामुळे कांदा भावावर दबाव आला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

District Bank Election: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीत ११६ वैध, तर ४४ अर्ज अवैध

Bhama Askhed Dam: भामा-आसखेडचे आवर्तन लांबणीवर

Farmers Demand: पीक विम्यातील ‘ट्रिगर’ काढून पाठीत खंजीर खुपसला

Seed Germination Testing: दर्जेदार रोपांसाठी बियाण्यांची उगवणक्षमता, जोम महत्त्वाचा

Brown Biorefinery: शेतावरील ‘ब्राउन बायोरिफायनरी’

SCROLL FOR NEXT