Onion Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Rate : राज्यात कांदा प्रश्न बिकट होण्याच्या मार्गावर

कांद्याचे पडलेले दर यावरून निर्माण झालेला प्रश्न आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

Team Agrowon

Onion Market Update छत्रपती संभाजीनगर : कांद्याचे पडलेले दर (Onion Rate) यावरून निर्माण झालेला प्रश्न आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. सरकारच्या शेतकरी विरोधी आयात-निर्यात धोरणाच्या (Import Export Policy) निषेध तसेच कांद्याचे पडलेले दर यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान लक्षात घेऊन येत्या ६ मार्चपासून राज्यव्यापी कांद्याच्या माळा घालून आंदोलन करण्यात येणार, असल्याची माहिती शेतकरी नेते धनंजय धोर्डे यांनी दिली.

श्री. धोर्डे यांच्या माहितीनुसार, सद्यस्थितीत बाजारात येत असलेला कांदा हा खरीपातील आहे. दुसरीकडे साधारणतः १५ मार्च नंतर रब्बीतील कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात येणे सुरू होईल.

आधीच दर पडलेले असताना नव्याने येणाऱ्या कांद्याच्या खरेदी दरावरही त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लाल व रांगडा कांदा तसेच रब्बी कांद्याचे पीक अद्याप शेतातच असतानाच कांद्याच्या भावात झालेली घसरण कांदा उत्पादकासाठी धोक्याची घंटा आहे.

त्यामुळे सरकारच्या शेतकरी विरोधी उदासीन धोरणाच्या निषेधार्थ सोमवारपासून (ता. ६) होळी सणाचे औचित्य साधून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी आंदोलनाची सुरवात होणार आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी स्वतःच्या गळ्यात, घरादाराला, सरकारी बसेस व रेल्वे तसेच सरकारी कार्यालयाला कांद्याच्या माळा घालून सरकारचे लक्ष वेधण्याचे आंदोलन छेडण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने करण्यात आला आहे.

यासंदर्भातील बैठकीसाठी मुकुंद खटाणे, बाळासाहेब पटारे,विलास कदम, उदय कुंजीर आदींची उपस्थिती होती.

प्रमुख मागण्या...

कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित किमान २५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावा.

कमी दराने खरेदी झालेल्या लाल व रांगडा कांद्याला फरकाचे अनुदान मिळावे.

कांदा निर्यातीस तातडीने चालना मिळावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT