Onion Rate : ‘कांदाप्रश्नी ठोस निर्णय होईपर्यंत माघार नाही’

बाजारात कांद्याला प्रतिक्विंटल २०० ते ५०० रुपये दर मिळत आहे. एकीकडे कांद्याला प्रतिक्विंटल उत्पादन खर्च १५०० रुपयांवर असताना मिळणाऱ्या दरात ७० टक्के त्यास तोटा होत आहे.
Onion Rate
Onion RateAgrowon

Onion Rate News नाशिक ः बाजारात कांद्याला (Onion Rate) प्रतिक्विंटल २०० ते ५०० रुपये दर मिळत आहे. एकीकडे कांद्याला प्रतिक्विंटल उत्पादन खर्च ()Onion Production Cost १५०० रुपयांवर असताना मिळणाऱ्या दरात ७० टक्के त्यास तोटा होत आहे.

सांगा असा व्यवहार जगाच्या पाठीवर केला जातो का, असा सवाल करत, सरकार शेतकऱ्याच्या अपरिहार्यतेचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी केला.

शासनाच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी बेमुदत उपोषण गुरुवारपासून (ता. २) पुकारले आहे. कांदाप्रश्र्नी सकारात्मक निर्णय होईपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

Onion Rate
Onion Rate : ‘आमच्या जीवनात ना ‘अर्थ’ ना ‘संकल्प’

‘ॲग्रोवन’शी बोलताना निंबाळकर यांनी सांगितले, की जानेवारीच्या पंधरवाड्यात कांद्याचे दर पडले. ही बाब मंत्रालयात माजीमंत्री बच्चू कडू यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली. पण त्यावर गांभीर्याने कुठल्याही हालचाली होत असल्याचे दिसून आले नाही.

त्यामुळे आमचे होणारे नुकसान पाहवत नाही. त्यामुळे शेतकरी म्हणून न्याय मिळण्यासाठी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले. प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण, राम बोरसे, रेवण गांगुर्डे, चंद्रभान गांगुर्डे, हरिभाऊ सोनवणे, विक्रम ठाकरे, केलास पगार, विनोद शिंदे आदी उपस्थित होते.

Onion Rate
Onion Rate : शेतकरी अडचणीत असताना सरकार झोपले होते का?

उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार प्रदीप पाटील, बाजार समिती प्रशासक अनिल पाटील, सचिव गोरक्ष गांगुर्डे, सहायक निबंधक कार्यालयाचे प्रतिनिधी, शिवसेनेचे नितीन आहेर, राष्ट्रवादीचे खंडेराव आहेर, प्रकाश शेळके आदींनी उपोषणस्थळी भेट दिली.

आंदोलकांच्या मागण्या :

किमान ५०० रु.क्विंटल अनुदान द्यावे.

अनुदान तोपर्यंत चालु ठेवावे जोपर्यंत सरासरी १२०० रु.प्रति क्विंटल भाव येत नाही.

बाजार समित्यांमध्ये नियमबाह्य खर्चावर लगेचच आळा घालावा.

बाजार समित्यामध्ये जिल्हाभर सरासरी बाजारभावात ३०० ते ५०० रूपये फरक होता कामा नये, यासाठी उपजिल्हानिबंधकांमार्फत समिती नेमून काम बघावे.

कांदा वांदा हे प्रकरण कायमचे मिटवून तसा कायदा व्हावा.

लिलावानंतर कांदा वाहतूक १ किमीपेक्षा जास्त नसावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com