Hapus Mango Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Hapus Mango Export : रत्नागिरीतून एक टन हापूस लेबनानला रवाना

Mango Season : कोकणातील हापूसला सातासमुद्रापार प्रचंड मागणी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रत्नागिरीतून थेट हापूसची निर्यात केली जात आहे.

राजेश कळंबटे

Ratnagiri News : कोकणातील हापूसला सातासमुद्रापार प्रचंड मागणी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रत्नागिरीतून थेट हापूसची निर्यात केली जात आहे. यंदा कोकणातील हापूसची चव प्रथमच लेबनानवासीयांनी चाखली आहे.

रत्नागिरीतील आंबा बागायतदार सलिल दामले यांनी एक टन आंबा नुकताच लेबनानला निर्यात केला आहे. आतापर्यंत कॅनडा, इंग्लंड, अमेरिका, चीनसह जपानला सहा टन आंबा थेट निर्यात केला आहे.

दर्जेदार हापूसचे उत्पादन घेण्यासाठी येथील सलिल दामले यांचे नाव घेतले जाते. यंदा हापूसचे उत्पादन चांगले आले आहे. त्यामुळे वाशीसारख्या बाजारात दलालांकडील दर कमी झाले आहेत. परंतु अनेक आंबा बागायतदार थेट ग्राहकाकडे विक्री करण्यावर भर देत आहेत. स्थानिक मार्केटबरोबरच निर्यातीवरही काही बागायतदारांचा कल असतो. त्याप्रमाणे रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे येथील दामले परिचित आहेत.

ते गेले काही वर्षे विविध देशांमध्ये आंबा पाठवत आहेत. यंदा एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यातच निर्यातीला सुरुवात केली आहे. आतापर्यंत लेबनानमध्ये थेट हापूस पाठविला नव्हता. दामले यांच्या मार्फत एक टन आंबा नुकताच निर्यात केला गेला आहे. तिथे उष्णजल प्रक्रिया करून आंबे पाठविले जातात. चेन्नई येथील प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया करून हापूस विमानाने लेबनानला गेला. यापुढे जपानला एक टन आंबा रवाना होणार आहे.

निर्यातीसाठी गॅप सर्टिफिकेट अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर कृषी विभागाचा अ‍ॅनलायटिक रिपोर्ट महत्त्वाचा असतो. हा अहवाल निर्यातीसाठी गरजेचा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील तीन बागायतदारांनी कृषी विभागाकडून याचा परवाना घेतला आहे. त्यासाठी बागांमध्ये वापरण्यात येणारी औषधे, खते यांची सविस्तर माहिती द्यावी लागते. बागांचे व्यवस्थापन कसे केले जाते, याची नोंदही ठेवली जाते. त्यानंतरच कृषी विभागाकडून रिपोर्ट देण्यात येतो.

हवाई वाहतूक दरात ३० टक्के वाढ

इस्राईल-पॅलेस्टाइन युद्धामुळे समुद्रमार्गे होणाऱ्या वाहतुकीत अडथळे आले आहेत. त्यामुळे मालवाहतुकीचा भार हवाई वाहतुकीवर आला आहे. परिणामी, हवाई वाहतुकीच्या दरात ३० टक्के वाढ झाली आहे. त्याचा फटका आंबा निर्यातदारांना बसत आहे.

अमेरिकेत आंबा पाठविण्यासाठी प्रतिकिलो ५०० रुपये खर्च येत होता. तोच आता ५७० ते ६४० रुपये प्रतिकिलो येत आहे. त्याचा परिणाम आंबा निर्यातीवर होत आहे. त्यावरही मात करीत सलिल दामले यांच्या बागेतील हापूस सहा देशांमध्ये गेला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indigenous Lifestyle: आदिवासींची निसर्गपूरक शेती अन् जीवनशैली

Farmer Safety: विविध दंश, विषबाधेपासून स्वसंरक्षणाच्या उपाययोजना

Maharashtra’s Grape Industry: जागतिक ‘व्हिजन’ ठेवून द्राक्ष उद्योगाची वाटचाल

Weekly Weather: राज्यात चांगल्या पावसाची शक्यता

Parbhani Cooperative Fraud: परभणीच्या तब्बल ४२ संस्थांची नोंदणी रद्द

SCROLL FOR NEXT