Raisin Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Raisin Market : सांगलीतील नवा बेदाणा विक्रीसाठी बाजारपेठेत

यंदाचा बेदाणा हंगामातील नवा बेदाणा बाजारपेठेत विक्रीस येऊ लागला आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli Raisin Market सांगली ः यंदाचा बेदाणा हंगामातील (Raisin Season) नवा बेदाणा बाजारपेठेत (Raisin Arrival) विक्रीस येऊ लागला आहे. सध्या बाजारपेठेत सुमारे ७ ते ८ टन इतका बेदाणा विक्रीस येत असून, बेदाण्यास प्रति किलोस १७० ते २३० रुपये असा दर आहे. बेदाण्याचे दर (Raisin Rate) टिकून असून, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बेदाण्याची आवक वाढेल, असे बेदाणा उद्योगातील जाणकारांनी सांगितले आहे.

यंदाच्या बेदाणा निर्मितीचा हंगाम सुरू झाला आहे. सांगली जिल्ह्यातील नागज परिसरासह अन्य भागांत बेदाणा तयार करण्यासाठी शेड सज्ज झाले आहेत. सध्या विक्री होऊन शिल्लक राहिलेल्या द्राक्षापासून बेदाणा तयार करण्यास शेतकरी पुढे आले आहेत.

त्यामुळे बेदाणा निर्मितीस फारशी गती आली नसल्याचे बेदाणा शेडच्या मालकांनी सांगितले आहे. जिल्ह्यातील तासगाव आणि सांगली बाजार समितीत नव्या बेदाण्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे नव्या बेदाण्याला अपेक्षित दर मिळत आहेत.

शेडवर परराज्यांतील मजूर

यंदा बेदाणा निर्मितीचा हंगाम जवळपास १५ ते २० दिवस लांबणीवर पडला आहे. त्यामुळे शेतकरी बेदाणा शेडची दुरुस्ती करून बेदाणा निर्मितीसाठी सज्ज झाले आहेत. बेदाणा शेडवर परराज्यांसह राज्यातील मजूरही दाखल झाले आहेत.

थॉमसन, माणिक चमन, सोनाका या द्राक्ष वाणांपासून प्रामुख्याने बेदाणा तयार केला जातो. सध्या नागज परिसरासह तासगाव, मिरज तालुक्यांच्या पूर्व भागात काही प्रमाणात बेदाणा निर्मिती सुरू झाली आहे.

या भागात पोषक वातावरण असल्याने दर्जेदार बेदाणा तयार होतो. सध्या बाजारपेठेत कर्नाटकातील बेदाणा विक्रीसाठी येत आहे.

बाजार समितीत ७ ते ८ टन बेदाण्याची आवक होत आहे. नव्या बेदाण्याला मागणी असल्याने दरही चांगले मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

चार महिने हंगाम चालण्याची शक्यता

बेदाणा हंगामास फेब्रुवारीच्या मध्यापासून गती येणार आहे. त्यामुळे नवा बेदाणा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बाजारात विक्रीस येईल. बेदाणा निर्मितीचा हंगाम सुमारे तीन महिने सुरू राहतो. यंदा देखील साडेतीन ते चार महिने हंगाम सुरू राहील, अशी शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

Nashik APMC: नाशिक बाजार समितीचे विभाजन रद्द करा : शिवाजी चुंभळे

Rahul Gandhi: दहा वर्षांत १५२ पेपरफुटीची प्रकरणे, तरीही एकाही दोषीला शिक्षा का नाही? राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Farmers Protest Suspend: देवगावातील ‘सरण आंदोलन’ तात्पुरते स्थगित

SCROLL FOR NEXT