Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : नवीन कापूस घरात, जुना अजूनही दराच्या प्रतिक्षेत

Cotton Arrival : या तालुक्यात यावर्षी कपाशीची लागवड मोठ्या क्षेत्रावर झालेली आहे. यंदा नवीन कापूस निघू लागला असतानाच जुना कापूस अजूनही शेतकऱ्यांच्‍या घरात पडून असल्‍याचे चित्र आहे.

 गोपाल हागे

Buldana News : या तालुक्यात यावर्षी कपाशीची लागवड मोठ्या क्षेत्रावर झालेली आहे. यंदा नवीन कापूस निघू लागला असतानाच जुना कापूस अजूनही शेतकऱ्यांच्‍या घरात पडून असल्‍याचे चित्र आहे. दराची प्रतीक्षा करीत शेतकरी थांबले होते.

कापसाला दोन वर्षांपूर्वी प्रति क्विंटल बारा हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. कापसाला मागील हंगामात १० हजार रुपयेही दर मिळू शकला नव्हता. भाववाढीच्या अपेक्षेने हा कापूस शेतकऱ्यांच्या घरात आजही पडून आहे.

यावर्षीचा नवीन कापूस घरात आला तरी जुन्या कापसाची विल्हेवाट लागत नसल्यामुळे कापूस ठेवावा तरी कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला. आजरोजी जुना कापूस प्रति क्विंटल केवळ ७ हजार २०० रुपयापर्यंत तर नवीन कापूस फक्त ६ हजार ते ६३०० रुपये प्रति क्विंटल भावाने मागितला जात आहे.

नांदुरा तालुक्यात यावर्षीच्या खरीप हंगामात दोन वेळेस अतिवृष्टी झाली आहे. सोबतच मॉन्सूनपूर्व लावलेल्या कपाशीवर बोगस बियाण्याचे सावट पाहायला मिळाले. कृषी विभागाच्या पीक पेरणी अहवालानुसार नांदुरा तालुक्यात ४९ हजार ०८७.५७ हेक्टर वहिताखालील क्षेत्रापैकी यावर्षी १६ हजार ५५९ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. सुरुवातीला मॉन्सूनपूर्व कपाशी एक महिन्याची झाली असताना हे पीक लाल पडून करपले. दोन वेळेच्या अतिवृष्टीमुळेही अनेक शेतकऱ्यांची पिकासह शेती खरडून गेली.

'जुना कापूस साठवू नका'

नांदुरा तालुक्यातील काही भागात गावांशेजारील शेतात मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंड अळीचे आक्रमण झाल्याने हे पीक संकटात सापडले होते. याबाबत कृषी विभागाकडे काही शेतकऱ्यांनी तोंडी तक्रार केली असता काही तज्ज्ञांनी या परिसराला भेट देऊन पाहणी केली.

त्यावेळी पिकावर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला होता. ज्या गावात फरदडचा कापूस कायम आहे, तेथे गुलाबी बोंड अळीला पोषक वातावरण मिळू शकते. यामुळे जुना कापूस साठवू नका असाही सल्ला दिलेला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT