Chana Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Procurement : अकोल्यातही ‘नाफेड’ची हरभऱ्याची खरेदी बंद

गेल्या १० दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून बुलडाण्यातील हमीभाव खरेदी बंद आहे.

Team Agrowon

Akola News गेल्या १० दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून बुलडाण्यातील हमीभाव खरेदी (MSP Procurement Center) बंद आहे. त्यात आता अकोला जिल्ह्यातही उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण देऊन खरेदी थांबविण्यात आली आहे.

यामुळे जिल्ह्यातील सुमारे १५ हजारांवर नोंदणीकृत शेतकरी आता हरभरा कुठे विकावा, या विवंचनेत आहेत. वाशीम जिल्ह्यातही लवकरच उद्दिष्ट पूर्ण होत असून, खरेदी बंद होण्याची चिन्हे आहेत. (Chana Procurement)

या हंगामात शासनाने १५ मार्चपासून हमीभावाने हरभरा खरेदीला सुरुवात केली. यासाठी ३१ मार्चपर्यंत नोंदणी प्रक्रिया राबविली. राज्यात लाखो शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली आहे. अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत मोठ्या संख्येने शेतकरी हरभरा विक्रीसाठी नोंदणीला आले होते.

अकोला जिल्ह्यात हमीभावाने ४ लाख १२ हजार क्विंटलचे उद्दिष्ट मिळाले होते. ते पूर्ण झाल्याने ‘नाफेड’ने पोर्टलवरील एन्ट्री बंद केल्या आहेत. अकोला जिल्ह्यात अद्याप १५ ते १६ हजार नोंदणीकृत शेतकऱ्यांना शेतीमाल केंद्रावर आणण्यासाठी संदेशही मिळालेले नाहीत.

शासनाकडून जिल्ह्यात ८ एजन्सींच्या माध्यमातून सुमारे ३५ केंद्रावर खरेदी प्रक्रिया राबविण्यात आली. मध्यंतरी पावसामुळे काही काळ खरेदी बंदही होती. त्यानंतर बारदाना नसल्यानेही खरेदीला ब्रेक लागला होता. आता खरेदीने जोर पकडला असताना उद्दिष्ट संपल्याच्या कारणाने खरेदी बंद करण्यात आली.

उद्दिष्ट वाढीचा प्रस्ताव

जिल्ह्याला कमी उद्दिष्ट असल्याने खरेदी बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात हरभऱ्याचे क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे हमीभाव खरेदीचे उद्दिष्ट वाढवून द्यावे, अशी मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे एका प्रस्तावाद्वारे केल्याची माहिती मिळाली आहे.

वाशीमची खरेदी पूर्ण होण्याच्या मार्गावर

लगतच्या वाशीम जिल्ह्यातही हरभरा खरेदीला लवकरच ब्रेक लागणार आहे. जिल्ह्याचे सुमारे ५० हजार क्विंटलचे उद्दिष्ट सध्या शिल्लक असल्याचे सांगितले जाते. आतापर्यंत दोन लाख क्विंटलपेक्षा अधिक खरेदी पूर्ण झालेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT