Chana Market : नाफेडने आतापर्यंत किती हरभरा खरेदी केला?

Chana Bajarbhav : नाफेडने देशात आतापर्यंत ८ लाख ३१ हजार टन हरभरा खरेदी केला. नाफेडची खरेदी वेगाने सुरु आहे. तर खुल्या बाजारातील आवक सध्या सरासरीपेक्षा कमी आहे.
Chana Market
Chana Market Agrowon

Chana Rate Update : नाफेडने देशात आतापर्यंत ८ लाख ३१ हजार टन हरभरा खरेदी केला. नाफेडची खरेदी वेगाने सुरु आहे. तर खुल्या बाजारातील आवक सध्या सरासरीपेक्षा कमी आहे.

तरीही खुल्या बााजारतील हरभरा दर हमीभावापेक्षा कमी आहेत. सध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांचा भाव मिळत आहे.

केंद्र सरकार यंदा कडधान्य बाजारावर बारीक लक्ष ठेऊन आहे. सर्वच व्यापारी आणि स्टाकिस्ट यांची माहिती सरकारने मागवली. तसेच चुकीची माहिती दिल्यास कारवाईची तंबाही दिली. तसेच अनेक व्यापारी चुकीची माहिती देत असल्याचेही सरकारचे म्हणणे आहे.

त्यामुळे व्यापारीवर्गात नाराजी दिसते. जे लोक चुकीचे करतात त्यांच्यावर सरकारने कारवाई करावी, पण त्यासाठी सर्वांनाच वेठीस धरणे योग्य नाही, असे व्यापारी सांगत आहेत. सरकराच्या या धोरणामुळे व्यापाऱ्यांनाही हरभरा खरेदी किंवा विक्रीत अडचणी येत असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे बाजारात मोठे व्यवहार होताना दिसत नाहीत.

Chana Market
Chana Procurement In Buldana : बुलढाण्यात हरभरा खरेदी सुरू होणार की नाही संभ्रम कायम

देशातील हरभरा बाजाराला सध्या नाफेडच्या खरेदीचा आधार मिळत आहे. नाफेडने आतापर्यंत देशातील पाच राज्यांमध्ये ८ लाख ३२ हजार टन हरभरा खरेदी केला. यापैकी ४ लाख ८८ हजार टनांची खेरदी महाराष्ट्रात झाली. यंदा महाराष्ट्रात हरभऱ्याची सर्वाधिक पेरणी झाली होती.

देशातील ११२ लाख हेक्टरपैकी तब्बल २९ लाख हेक्टर क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात होती. त्यामुळे सहाजिकच उत्पादनही अधिक आहे. त्यातच पुढीलवर्षी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकाही आहेत. त्यामुळं सरकारने राज्यात खरेदी वाढवली आहे.

महाराष्ट्रापाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये खरेदी झाली. नाफेडने गुजरातमध्ये आतापर्यंत २ लाख ३९ हजार टनांची खरेदी केली. तर कर्नाटकात केवळ ६८ हजार टन हरभरा खरेदी झाला. आंध्र प्रदेशात ५२ हजार टन आणि उत्तर प्रदेशात नाफेडने ८३९ लाख टनांची खरेदी केली.

नाफेडची खेरदी सुरु असल्याने खुल्या बाजारातील हरभरा आवक सध्या कमी आहे. पण तरीही हरभऱ्याचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत.

Chana Market
Kabuli Chana Rate : खानदेशात मोठ्या काबुली हरभऱ्यास ११ हजार रुपये

सध्या हरभऱ्याला खुल्या बाजारात प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांचा दर मिळत आहे. हरभरा दर मागील एक वर्षापासून दबावात आहेत. नाफेडकडे मागील हंगामातील शिल्लक साठा १४ लाख टनांच्या दरम्यान आहे. तर यंदाही खरेदी सुरु आहे.

त्यामुळे नाफेडकडे गेल्यावर्षीएवढा स्टाॅक होऊ शकतो, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. याचा दबाव पुढील काळात बाजारावरही जाणवेल, असा अंदाज दिला जात आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com