Onion Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Procurement : ‘नाफेड’, ‘एनसीसीएफ’च्या कांदा खरेदीची होणार चौकशी

Onion Market : ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ने खरेदी केलेल्या कांद्यासंबंधीची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी तहसीलदारांना दिले आहेत.

Team Agrowon

Nashik News : ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ने खरेदी केलेल्या कांद्यासंबंधीची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी तहसीलदारांना दिले आहेत. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी तीन दिवसांपासून कांद्याचे लिलाव बंद ठेवले आहेत. त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली तरी हे व्यापारी आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

अशा परिस्थितीत ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ने शेतकऱ्यांचा कांदा सरकारने निश्चित केलेल्या किमान आधारभूत मूल्यानुसार अर्थात प्रतिक्विंटल दोन हजार ४०० रुपयांनीच खरेदी करणे आवश्यक आहे. पण ‘एनसीसीएफ’ने आपली खरेदी केंद्रे नेमकी कुठे आहेत, याबाबत अपेक्षित प्रसिद्धी केलीच नाही.

‘नाफेड’ने प्रसिद्धी केली असली तरीही प्रत्यक्षात स्थानिक स्तरावर त्याचे विशेष परिणाम दिसत नसल्याची तक्रार शेतकरी संघटनांकडून होत आहे. व्यापाऱ्यांकडून माल खरेदी करण्यात आल्याचे आरोपही केले जात आहेत. त्यामुळे आता जिल्हाधिकारी शर्मा यांनी ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ने किती कांदा खरेदी केला.

कोणाकडून खरेदी केला. त्याला दर किती दिला, अशा सर्वच बाबींची तपासणी करण्याचे आदेश संबंधित तहसीलदारांना दिले आहेत. अहवाल आल्यानंतर तत्काळ हा विषय निकाली काढला जाईल, असेही शर्मा यांनी सांगितले.

राजकीय हस्तक्षेपाची शक्यता

‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ यांनी कांदा कुठे खरेदी केला, याच्या चौकशीचे आदेश दिलेले असले तरी त्याला राजकीय किनार आहे. नेत्याशी निगडित कार्यकर्त्यांकडूनच कांद्याची खरेदी झाली असल्याचे समजते. त्यामुळे या चौकशीतून फार काही निष्पन्न होईल, अशी अपेक्षा नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT