Onion Market Onion Market
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Market : कांदा वितरण प्रकरणात ‘नाफेड’कडून गोवा महासंघाची नाहक बदनामी

Goa Federation : कांद्याचे दर वाढल्यानंतर कांदा वाटपासाठी गोवा महासंघाला कांदा पाठवण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार ‘नाफेड’ने हँडलिंग एजन्सीमार्फत हा कांदा नाशिकमधील महासंघांकडून गोव्यात पाठवला.

मुकूंद पिंगळे

Nashik News : ‘नाफेड’ने ग्राहकांसाठी गोव्यात पाठविलेल्या कांदा वाहतुकीतील गैरव्यवहार समोर आला आहे. त्यात कांदा वाहतूक रस्ता मार्गाने झाल्याचे पुरावे मिळत नसल्याने ‘नाफेड’ने गोवा सहकारी विपणन व पुरवठा महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालयाविरोधात नाशिकमध्ये फसवणुकीबाबत गुन्हा नोंदविला आहे.

मात्र पहिल्या टप्प्यात कांदा गोव्यात पोहोचला. तो वितरीत झाला. परंतु कांदा निकृष्ट असल्याने दुसऱ्या टप्प्यात गोवा महासंघाने काम थांबविले. त्यामुळे आता ‘नाफेड’ हे गोवा महासंघाची नाहक बदनामी करत आहे, असा खळबळजनक दावा महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक काशिनाथ नाईक यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना केला.

कांद्याचे दर वाढल्यानंतर कांदा वाटपासाठी गोवा महासंघाला कांदा पाठवण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार ‘नाफेड’ने हँडलिंग एजन्सीमार्फत हा कांदा नाशिकमधील महासंघांकडून गोव्यात पाठवला. मात्र त्याची गुणवत्ता नव्हती.

कांद्याच्या मागणीपोटी गोवा महासंघाने ‘नाफेड’कडे ८ कोटी रुपये जमा केले होते. असे असताना पाच कोटी रुपयांचा कांदा आला; मात्र तो कांदा निकृष्ट असल्याने तीन कोटी रुपयांचा कांदा महासंघाने ताब्यात घेतलेला नाही, असे नाईक यांचे म्हणणे आहे.

पहिल्या टप्प्यातील ५ कोटी किमतीच्या कांद्याची पुरवठा व वितरण कार्यवाही झाल्यानंतर संबंधित सर्व कागदपत्रे केंद्रीय ग्राहक व्यवहार विभाग व ‘नाफेड’कडे वेळोवेळी सादर करण्यात आली आहेत. मात्र तरीही बदनामी सुरू असल्याचे नाईक यांनी सांगितले.

प्रत्यक्षात कांदा नाशिकमधून गोवा येथे ७११ किलोमीटर अंतर पोहोचण्यासाठी १४ ते १५ तास वेळ लागतो. मात्र नाशिकमधून कांदा वाहनात भरून तो वजन करून निघाल्यानंतर अवघ्या ९ तासांत पोहोचल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे शंका बळावल्याने नाफेड कार्यालयाने पुरावा म्हणून फास्टॅग चलन मागितले आहे; मात्र ते सादर होत नसल्याने गुन्हा नोंदविला गेला. मात्र ‘नाफेड’ने व्यवहार करताना अशी कुठलीही अट समोर ठेवली नव्हती. आता मागणी होत असल्याने आम्ही यास जबाबदार नसून हँडलिंग एजन्सीकडे वाहनांच्या संबंधित माहिती आहे, आम्ही वितरण केलेले आहे, असे सांगत त्यांनी अधिकचे बोलणे टाळले.

गोंधळ वाढला

‘नाफेड’च्या माध्यमातून शेतकरी कंपन्यांच्या महासंघांकडून कांदा पुरवठा करण्यात आला आहे, या संदर्भात सर्व कागदपत्रे नाफेडच्या कार्यालयाकडे प्राप्त आहेत. त्यामुळे आमचा थेट संबंध राहिलेला नाही असे महासंघांच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे.

तर आमच्याकडे कांदा प्राप्त झाला, त्याचे वितरणही गोवा राज्यात करण्यात आले आहे, त्याची संबंधित कागदपत्रे केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाकडे व ‘नाफेड’कडे सादर करण्यात आली आहेत.

त्यामुळे आता आमचा संबंध नाही असे गोवा महासंघाचे म्हणणे आहे. मात्र ‘फास्टॅग’ तपशील मिळत नसल्याने गैरव्यवहार झाला; मात्र यात कोणती नावे पुढे येणार आहे हे तपासणीअंती समोर येईल. मात्र सध्या एकमेकांकडे बोट दाखवण्याचा प्रकार सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT