Onion Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Rate : ‘नाफेड’, ‘एनसीसीएफ’च्या हस्तक्षेपामुळे कांदा दरात घसरण

मुकुंद पिंगळे

Nashik News : केंद्र सरकारकडून कांदाप्रश्नी घेतलेल्या गेल्या दीड वर्षातील विविध धोरणांमुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. आता शेतकऱ्यांना दराचा काहीसा दिलासा मिळत असताना केंद्र सरकार खरेदी केलेला बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणून ताटात माती कालवीत असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’च्या हालचालींमुळे बाजारात दर पडल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात मंगळवारी (ता. ३) व बुधवारी (ता. ४) प्रमुख बाजार समितींमध्ये विक्री झालेल्या कांदादरात क्विंटलमागे २५० ते ४०० रुपयांपर्यंत घसरण झाली.

बफर स्टॉकमध्ये पावणेपाच लाख टन कांद्याची खरेदी करून साठवला आहे. हा कांदा दरात मोठी वाढ झाल्यानंतर बाजारात येणे अपेक्षित आहे. अजूनही बाजारात शेतकऱ्यांच्या माध्यमातून आवक होत असताना हा कांदा बाहेर आणला जात असल्याने बाजारात अस्थिरता निर्माण झाली. एकीकडे मे ते जुलैपर्यंत कांद्याची खरेदी विविध केंद्रांवर झाली. त्या वेळी बाजार समित्यांमधील दराच्या तुलनेत हे दर ४०० ते ५०० रुपयांनी कमी होते. तर शेवटच्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांच्या कांद्याची खरेदी झाली त्यांना अद्याप देयके मिळाले नाहीत. अशातच शेतकऱ्यांच्या चाळीत कांदा असताना बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

‘एनसीसीएफ’कडून कांदापुरवठा सुरू

‘नाफेड’ने मुंबई, बंगळूर, भुवनेश्वर व पाटणा या शाखांच्या माध्यमातून कांदा पुरवठ्यासाठी निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. तर यापूर्वीच गोणी वाहतूक या संदर्भातही निविदा अंतिम टप्प्यात आहेत. दुसरीकडे याच पद्धतीने ‘एनसीसीएफ’नेही तयारी पूर्ण केली आहे. २०० टनांवर कांदा दिल्ली येथे पाठविण्यात आल्याचे कळविण्यात आले.

शेतकऱ्यांकडे चाळीत कांदा साठवणूक असून अजून विक्री झालेली नाही. देशभरात बाजारांमध्ये आवक संतुलित आहे. मात्र घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. अफवेमुळे दर पडल्याने शेतकऱ्यांचे क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपयांचे नुकसान आहे. सरकारला दिलासा देता येत नसेल, तर शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवू नये. सरकारने परिस्थिती अभ्यासून नंतरच कांदा बाजारात आणावा.
संदीप मगर, कांदा उत्पादक शेतकरी, वाखारी, ता. देवळा
कांद्याच्या दरात ६ ते ७ रुपयांची तेजी होती. काही ठिकाणी सकाळच्या पहिल्या सत्रात लिलाव संपण्यापूर्वी दरात पुन्हा घसरण झाली. दुपारच्या सत्रात ५ ते ६ रुपयांची पुन्हा घसरण झाली. यात नेमके कारण कळलेले नाही. यात नाफेड एनसीसीएफ जबाबदार आहे. सरकारने रेशनमधून कांदा वाटावा, मात्र शेतकरी व व्यापाऱ्यांच्या माल बाजारात असताना तो पाठवून दर पाडू नये.
संदीप पगार, कांदा उत्पादक शेतकरी, कुंडाने, ता. कळवण

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan Scheme : पी.एम.किसान योजना; अठराव्या हप्त्यास शेतकरी मुकणार, तेरा हजार खाती आधार लिंकविना

Indian Agriculture : शिळ्या कढीला ऊत

Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुका तीन टप्प्यांत

Budget Update : अर्थसंकल्पातून प्रत्येक समाज घटकाला न्याय : अजित पवार

Watershed Mismanagement Case : पाणलोट गैरव्यवहारप्रकरणी फौजदारी कारवाई करा

SCROLL FOR NEXT