Pune News : देशात आणि मुख्यत: दिल्लीसह एनसीआरच्या काही भागात टोमॅटो महाग झाले आहेत. येथे टोमॅटोने शंभरी पार केल्याने सर्वसामान्य ग्राहकांमध्ये सरकारविरोधात नाराजी उमटत आहे. यावरून ग्राहकांनासाठी नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया (NCCF) ने निर्णय घेतला असून एनसीसीएफ ६० रुपये प्रति किलो दराने टोमॅटो थेट ग्राहकांना विकणार आहे.
देशात पाऊस जोरदार होत असून यामुळे पिकांना फटका बसला आहे. ज्याचा परिणाम पुरवठ्यावर झाला असून भाज्यांचे दर वाढले आहेत. सध्या काही भाज्यांचे दर उतरले असून दिल्लीसह एनसीआरच्या काही भागात टोमॅटो १०० ते १२० प्रति किलोच्या घरात पोहोचला आहे. त्यावरून एनसीसीएफने हा निर्णय घेतला आहे. तर एनसीसीएफ २९ जुलैपासून ग्राहकांना टोमॅटो ६० प्रति किलो दराने उपलब्ध करून देणार असल्याचे हिंदुस्तान टाईम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे.
तसेच ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २७ जुलै रोजी दिल्लीत टोमॅटोची किरकोळ किंमत ७० रुपये प्रति किलो होती. गुणवत्तेनुसार आणि स्थानानुसार, काही भागात दर ८० रुपये किलोपेक्षा जास्त झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे टोमॅटो पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. पुरवठा वेळेवर न झाल्याने दिल्ली एनसीआरमध्ये टोमॅटोचा तुटवडा निर्माण असून पावसामुळे टोमॅटोची नासाडी वाढल्याचा दावा मंत्रालयाने केला आहे.
तर एनसीसीएफकडून २९ जुलैपासून टोमॅटो विक्रीला सुरूवात होणार असून हळूहळू दिल्ली एनसीआरच्या सर्व भागात विक्री केंद्रे सुरू केली जाणार आहेत. मात्र आता टोमॅटोची विक्री कृषी भवन, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी कॉलनी, हौज खास, पार्लमेंट स्ट्रीट, आयएनए मार्केट आणि नोएडा, रोहिणी आणि गुरुग्राममधील भागात केली जाणार आहे. टोमॅटोच्या विक्रीने बाजारात टोमॅटोच्या वाढत्या किमती थांबण्यास मदत मिळणार असून याचा लाभ ग्राहकांना पोहचेल असे एनसीसीएफच्या म्हणणे आहे.
इतर भागातही विक्री सुरू होईल
सध्या बाजारात टोमॅटोचे किरकोळ भाव १०० ते १२० रुपये प्रतिकिलो असून एनसीसीएफच्या उपक्रमाचा उद्देश ग्राहकांना दिलासा देणे आहे. ग्राहकांना निम्म्या दराने टोमॅटो उपलब्ध करून देणे आहे. टोमॅटोची स्वस्त दरात विक्री करण्यासाठी एनसीसीएफ व्यतिरिक्त नाफेडलाही तैनात करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे.
पावसामुळे टोमॅटो पिकाचे नुकसान झाले
उत्तर प्रदेश, दिल्ली एनसीआर आणि हरियाणासह संपूर्ण उत्तर भारतात टोमॅटोच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, यूपी आणि हिमाचल प्रदेशातील मुरादाबादमधून यूपी आणि दिल्लीला टोमॅटोचा पुरवठा केला जातो. हिमाचलमध्ये पाऊस आणि भूस्खलनामुळे पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्याचवेळी यूपीच्या मुरादाबाद भागात मुसळधार पावसामुळे टोमॅटो पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी कंबरेपर्यंत पाणी शेतात साचल्याने टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गेल्या वर्षी टोमॅटो २५० रूपये होता
दरम्यान यंदा एनसीसीएफने ग्राहकांच्या हिताचा विचार १५ दिवस उशिरा का घेतला असा सवाल ग्राहक करताना दिसत आहेत. गेल्या वर्षी टोमॅटो २५० रूपये प्रतिकिलोवर गेला होता. त्यावेळी एनसीसीएफने १४ जुलैपासूनच दिल्ली एनसीआरमध्ये स्वस्त दरात टोमॅटोची विक्री सुरू केली होती. मात्र यावेळी स्वस्त दरात टोमॅटोची विक्री सुमारे १५ दिवस उशिराने झाली आहे. गेल्या वर्षी एनसीसीएफने टोमॅटो ९० रुपये किलोने विकायला सुरुवात केली होती. जी नंतर ८० ते ७० रुपये किलो झाली. तर केंद्र सरकारला टोमॅटोचे भाव अटोक्यात आणण्यासाठी नेपाळमधून १० टन टोमॅटोची आयात करावी लागली होती.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.