Onion Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Export Policy : धोरणात तातडीने बदल करा; कांदा उत्पादकांना न्याय द्या

Onion Rate Crisis : कांद्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे. मात्र सरकारच्या योग्य नियोजनाअभावी शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी आर्थिक संकटाचे कारणही ठरू शकते.

Team Agrowon

Nashik News : कांद्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे. मात्र सरकारच्या योग्य नियोजनाअभावी शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी आर्थिक संकटाचे कारणही ठरू शकते. याच पार्श्‍वभूमीवर, निर्यात धोरणात तातडीने सकारात्मक बदल करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे व धुळ्याच्या खासदार शोभा बच्छाव यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन केली आहे.

निर्यातीवर मिळणारा शुल्क परतावा अत्यंत कमी असून तो ५ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात यावा आणि निर्यातदारांना ७ टक्क्यांपर्यंत वाहतूक व विपणन अनुदान द्यावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. यामुळे निर्यात वाढ होऊन देशांतर्गत बाजारात अतिरिक्त पुरवठ्याचा ताण कमी होईल व शेतकऱ्यांना उत्पादनाचा योग्य भाव मिळण्यास मदत होईल, असा मुद्दा चर्चेवेळी मांडण्यात आला आहे.

यंदा झालेल्या चांगल्या पावसामुळे कांद्याचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः ऑगस्टपासून दक्षिण भारतातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होणार आहे.

त्यामुळे देशांतर्गत बाजारात दरात घसरण होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने वेळेवर उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे, अशी आग्रही मागणी भेटीदरम्यान करण्यात आली.

शेतकऱ्यांचे उत्पन्न सुरक्षित ठेवण्यासाठी हे पाऊल निर्णायक ठरेल, असे या वेळी नमूद करण्यात आले. अर्थमंत्री सीतारामन यांची भेट घेऊन तर वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे पत्राद्वारे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी मांडण्यात आल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Flood : पूरबाधित ४० गावांतील नुकसानग्रस्त घरांच्या तातडीने याद्या तयार करा

Pomegranate Crop Damage : सांगली जिल्ह्यात डाळिंबाचे नुकसान

Seena River Flood : पूरग्रस्त गावातील पशुधनाला चारा वाटप

Girna Dam : गिरणा धरणात पाण्याची आवक

Bajari Crop : बाजरी पक्वतेच्या मार्गावर; पीकही जोमात

SCROLL FOR NEXT