Parbhani News : किंमत आधार योजनेअंतर्गत हमीभावाने (प्रतिक्विंटल ४८९२ रुपये) परभणी व हिंगोली जिल्ह्यांत राज्य सहकारी पणन महासंघ अंतर्गतच्या २७ केंद्रांवर गुरुवारपर्यंत (ता. ६) ३० हजार ८४२ शेतकऱ्यांचे ६ लाख ४७ हजार ७६९ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले आहे.
गुरुवारी (ता. ६) खरेदी बंद झाली. त्यामुळे संदेश न पाठविलेल्या ५ हजार ६३२ शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी होऊ शकली नाही, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी के. जे. शेवाळे यांनी दिली.
हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी १५ ऑक्टोबर ते १२ जानेवारीपर्यंतची मुदत होती. सोयाबीन खरेदी बाकी असलेल्या नोंदणीकृत शेतकऱ्यांची जास्त असल्यामुळे सुरुवातीला ३१ जानेवारीपर्यंत व त्यानंतर ६ फेब्रुवारीपर्यंत अशी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. राज्य सहकारी पणन महासंघ अंतर्गत खरेदी केंद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी १ ऑक्टोबर २०२४ ते ६ जानेवारी २०२५ या कालावधीत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील ४९ हजार ७२४ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली.
त्यात परभणी जिल्ह्यात राज्य सहकरी पणन महासंघ व केंद्रीय नोडल एजन्सी राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ (नाफेड) अंतर्गतच्या १२ खरेदी केद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी २३ हजार ८०३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यापैकी १८ हजार ६२७ शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर सोयाबीन वजनमापासाठी घेऊन येण्याचे संदेश पाठविण्यात आले, तर ५ हजार १७६ शेतकऱ्यांना संदेश पाठविण्याचे प्रलंबित राहिले.
खरेदी केंद्रावर सोयाबीन आणलेल्या ११ हजार ७०७ शेतकऱ्यांचे २ लाख ४७ हजार ३१० क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले. हिंगोली जिल्ह्यात राज्य सहकारी पणन महासंघ व केंद्रीय नोडल एजन्सी राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) अंतर्गतच्या १५ खरेदी केंद्रांवर २५ हजार ९२१ शेतकऱ्यांनी ऑलाइन नोंदणी केली.
त्यापैकी २५ हजार ४६५ शेतकऱ्यांना खरेदी केंद्रांवर वजनमापासाठी सोयाबीन घेऊन येण्याचे संदेश पाठविण्यात आले तर ४५६ शेतकऱ्यांना संदेश पाठविण्याचे प्रलंबित राहिले. खरेदी केंद्रावर सोयाबीन आणलेल्या १९ हजार १३५ शेतकऱ्यांचे ४ लाख ४५९ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले, असे शेवाळे यांनी सांगितले.
परभणी-हिंगोली जिल्हे पणन महासंघ अंतर्गत सोयाबीन खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये)
केंद्र ठिकाण...नोंदणीकृत शेतकरी...सोयाबीन खरेदी...शेतकरी संख्या
परभणी...२६३२...२६०४०...१२४४
पेडगाव...१९६६...१८४८४...९३७
झरी...३१६...३६५८...१६३
वरपूड...५२८...८६८०...३८६
बोरी...२९३७...३५१४७...१३९०
जिंतूर...१५६९...९३०३...५९१
सेलू...४५४६...३४०८०...१९३९
मानवत...२०१३...१२८१९...७३८
रूढीपाटी...१०३१...२०१८८...९१२
पाथरी...१७०१...२६३१७...१२७४
सोनपेठ...२१५९...४१५३७...१३९०
पूर्णा...२४०५...१११२७...५९३
हिंगोली...१९५१...३१८३१...१३४९
कन्हेरगाव...१५८५...२७५९२...१०४८
कळमनुरी...१९८६...२१६८९...१०७५
वारंगा...११९६...१५०५३...७५१
वसमत...२१२९...३२१५०...१६७१
जवळा बाजार...२८७४...२३६३३...१५१८
येळेगाव...१४५८...२८३०९...१३५३
सेनगाव...१९२२...४९२१३...२०७७
साखरा...१२८४...१८०००...८३०
शिवणी खुर्द...१४११...१९१८३...१०११
फाळेगाव...२११६...३०३७५...१४५४
नागसिनगी...१७९२...३७१७०...१६३४
आडगाव...२१४४...३४२११...१८१६
उमरा...३९४...६४६८...३१५
पुसेगाव...१६७९...२३५८३...११५१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.