Soybean Procurement : बीड जिल्ह्यात निम्मी सोयाबीन खरेदी बाकी

Soybean Market : सोयाबीन खरेदी रखडली होती. खरेदीची मुदत १२ जानेवारी रोजी संपली होती. तर केंद्र सरकारने ही मुदत ३१ जानेवारीपर्यंत वाढवली होती. त्यानंतर पुन्हा ही मुदतवाढ देण्यात आली.
Soybean Procurement
Soybean MarketAgrowon
Published on
Updated on

Beed News : जिल्ह्यात सर्वाधिक पेरा असलेले सोयाबीन पिकाणे यंदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. मागील चार महिन्यापासून शासनाच्या सुरू आलेल्या खरेदी केंद्रावर गुरुवारी (ता. ६) खरेदीच्या अंतिम दिवशी नोंदणी केलेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी केवळ ५० टक्के शेतकऱ्यांची खरेदी पूर्ण झालेली आहे. शासनाकडून पुढे तारीख वाढविण्यात न आल्याने आता खरेदी राहिलेल्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन बाजारात पडलेल्या भावाने विक्री करण्याशिवाय पर्याय उरला नाही.

यंदाच्या वर्षी पाऊसकाळ चांगला राहिल्याने खरीपातील पिके देखील जोमात आली होती. मागील काही वर्षात जिल्ह्यातील मुख्य पीक बनलेले सोयाबीन चे बऱ्यापैकी उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती पडले होते. परंतु, भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन घरामध्ये पडून होते.

शेतकऱ्यांच्या मागणी नुसार शासनाकडून हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले. ज्यामध्ये शेतकऱ्यांकडून ४ हजार ८९२ या दराने सोयाबीन खरेदी करण्यात येऊ लागले. परंतु, यासाठी देखील अनेक अडथळ्यांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. यामध्ये विशेष म्हणजे बारदाना नसल्याने सोयाबीन खरेदीला खिळ बसली होती आणि सोयाबीन खरेदी रखडली होती.

Soybean Procurement
Soybean Procurement : ६३ हजार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

खरेदीची मुदत १२ जानेवारी रोजी संपली होती. तर केंद्र सरकारने ही मुदत ३१ जानेवारीपर्यंत वाढवली होती. त्यानंतर पुन्हा ही मुदतवाढ देण्यात आली. ती देखील गुरुवारी (ता.६) संपल्याने खरेदीसाठी नोंदणी करूनही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करणे बाकी आहे.

Soybean Procurement
Soybean Procurement: सोयाबीनची १८ टक्केच शासकीय खरेदी

...तर कमी किमतीत जाणार माल

मागील वर्षभरापासून सोयाबीनचे दर सतत पडत आहेत. बाजारात सध्या ४ हजारापर्यंत सोयाबीनचे दर आहेत तर शासनाच्या हमी भाव केंद्रावर ४ हजार ८९२ या दराने खरेदी करण्यात येत होती. परंतु, आता शासनाकडून खरेदीची तारीख संपल्याने राहिलेल्या शेतकऱ्याला क्विंटल मागे ८०० रुपयांचा तोटा सहन करून कमी किमतीत आपले सोयाबीन विकण्याची वेळ आलेली आहे.

...अशी झाली होती नोंद

जिल्ह्यात एकूण ३० केंद्रावर शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी करण्यात येत होती. यासाठी ४४ हजार ७४४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. परंतु, तीन वेळा मुदत वाढवून देखील यापैकी केवळ २० हजार ९६९ शेतकऱ्यांकडून ५ लाख ९४ हजार २०१ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यास नाफेडला यश आले असून जिल्ह्यात अजूनही २३ हजार ७७५ शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करणे बाकी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com