Soybean
Soybean Agrowon

Soybean Procurement: सोयाबीनची १८ टक्केच शासकीय खरेदी

Soybean Market: खुल्या बाजारात सोयाबीनला हमीदरापेक्षाही कमी दर असले तरी या बाजारात शासकीय खरेदीपेक्षा अधिक खरेदी झाली आहे. या हंगामात गेल्या पाच महिन्यांत जिल्ह्यातील अकरा बाजार समितीत १८ लाख ५४ हजार १७२ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे.
Published on

Amravati News: खुल्या बाजारात सोयाबीनला हमीदरापेक्षाही कमी दर असले तरी या बाजारात शासकीय खरेदीपेक्षा अधिक खरेदी झाली आहे. या हंगामात गेल्या पाच महिन्यांत जिल्ह्यातील अकरा बाजार समितीत १८ लाख ५४ हजार १७२ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे. तर ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या शासकीय खरेदीत ३ लाख ४६ हजार ६३४ क्विंटलची खरेदी आहे.

बाजारात सोयाबीनचे दर पडल्याने शेतकऱ्यांचा रोष निवडणुकीत ओढवू नये, यासाठी सोयाबीनची हमीदराने शासकीय खरेदी राज्य सरकारने केली. आता त्यास सहा फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढही देण्यात आली. तथापि, बाजारात दर हमीदराच्या तुलनेत जवळपास आठशे रुपयांनी पडले असतानाही शेतकऱ्यांनी खुल्या बाजारास दिलेला प्रतिसाद शासकीय खरेदीवर प्रश्‍नचिन्ह लावणारा ठरला आहे.

Soybean
Soybean Procurement: सोयाबीन खरेदीसाठी १३ पर्यंतमुदतवाढीचा केंद्राकडे प्रस्ताव

राज्य सरकारने नाफेडच्या माध्यमातून खरेदी करण्यासाठी राज्यभरात ५०० वर केंद्र सुरू केलेत. १४ लाख १३ हजार २७० मेट्रिक टन खरेदीचे लक्ष्यांक निर्धारित केले. यामध्ये अमरावती जिल्ह्यासाठी ९१.६० टन लक्ष्यांकाचा समावेश आहे. यानुसार ९ लाख १६ हजार ७६ क्विंटलची खरेदी अपेक्षित होती.

Soybean
Soybean Procurement : ६३ हजार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

मात्र नोंदणीकृत शेतकऱ्यांचाच सोयाबीन खरेदी करण्याचे धोरण लागू केले. नोंदणीत वारंवार तांत्रिक अडचणी आल्याने हजारो शेतकरी वंचित राहिलेत. त्यामुळे शासकीय खरेदीचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकला नाही.

ऑक्टोबर २०२४ पासून ३१ जानेवारीपर्यंत १७ हजार ९७ शेतकऱ्यांचा ३ लाख ४६ हजार ६३४ क्विंटलची खरेदी होऊ शकली. त्या तुलनेत सरासरी चार हजार रुपये क्विंटल दराने जिल्ह्यातील अकरा बाजार समितीत १८ लाख ५४ हजार १७२ क्विंटलची खरेदी झाली. शासकीय खरेदीचे बाजार समितीच्या तुलनेत हे प्रमाण १८ टक्के आहे, तर लक्ष्यांकाच्या तुलनेत ३७ टक्के आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com