Cotton Agrowon
मार्केट ट्रेंड

Cotton Market : कापूस बाजाराची स्थिती काय ?

देशात मागील पाच दिवसांपासून पाऊस उघडला. त्यामुळे कापूस वेचणीच्या कामांना वेग आला आहे. कापड उद्योगाने यंदा उत्पादन जास्त राहील, असे सांगितले.

Team Agrowon

पुणेः देशात मागील पाच दिवसांपासून पाऊस (Heavy Rainfall) उघडला. त्यामुळे कापूस वेचणीच्या (Cotton Picking) कामांना वेग आला आहे. कापड उद्योगाने यंदा उत्पादन जास्त राहील, असे सांगितले. मात्र पावसाने जास्त नुकसान आहे, त्यामुळे उत्पादन (Cotton Production) कमीच राहील, असे शेतकरी सांगत आहेत.

दिवाळीमुळं देशातील अनेक बाजारपेठा किमान आठवडाभर बंद असतात. काही बाजार समित्यांमध्ये व्यवहार सुरु आहेत. मात्र अशा बाजार समित्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यातच मागील तीन दिवसांमध्ये बाजारांमधील कापूस आवक नगण्य आहे. सोमवारपासून दिवाळी सण सुरु झाल्यानं शेतकऱ्यांनी कापूस विक्री कमी केल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

उत्तर भारतात पूर्वहंगामी कापसाची आवक सप्टेंबर महिन्यापासून सुरु झाली होती. मे महिन्यातील लागवडी सप्टेंबरमध्येची वेचणीला आल्या होत्या. त्यामुळे पंजाब, हरियाना आणि राजस्थान या महत्वाच्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये लवकर आवक झाली. मात्र यंदा या तिन्ही राज्यांमध्ये कापूस उत्पादन घटल्याचं स्पष्ट झालं.

उत्तर भारतात तर उत्पादन घटलं, मात्र गुजरात आणि महाराष्ट्रात कापूस उत्पादन वाढल्यानं एकूणच देशातील उत्पादन वाढेल, असा अंदाज काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने व्यक्त केला. मात्र ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच गुजरात आणि महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसानं महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील पिकाला मोठा फटका बसला. कापूस पिकात काही दिवस पाणी साचले. वेचणीला आलेला कापूस ओला झाल्यानं वाती झाल्या, बोंड सडली. त्यामुळे महाराष्ट्रातील कापूस उत्पादन कमीच राहील, असं शेतकरी सांगत आहेत.

तर गुजरातमधील कापूस उत्पादक भागांमध्येही पिकाचं नुकसान झालं. त्यामुळे गुजरातमधील कापूस पिकही यंदा कमीच राहील. म्हणजेच देशातील कापूस उत्पादन उद्योगाच्या अंदाजापेक्षा कमीच राहील. सध्या अनेक देशांमध्ये महागाईमुळं कपड्यांना मागणी घटलेली आहे. परिणामी कापसाला उठाव नाही.

पुढील महिना-दीड महिन्यात कापसाला मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं कापूस दरातही सुधारणा होऊ शकते. सध्या कापसाला ७ हजार ते ९ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळतोय. मात्र पुढील काळात कापसाला उठाव मिळेल. तसचं कापसातील ओलावाही कमी होईल. त्या काळात कापसाला सरासरी ९ हजार रुपयांपर्यंत दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agripreneurship MOU: कृषी विद्यापीठ, सह्याद्री फार्म्समध्ये करार

Jalalakshmi Irrigation Scheme: जललक्ष्मी प्रवाही योजनेचा २३ गावांतील शेतीला लाभ

Tiger Attack Compensation: सोनवणे कुटुंबाला १० लाखांचा धनादेश

Solapur Development Projects: वारी, कॉरिडॉर, आयटी पार्कला ‘टॉप प्रायोरिटी’

Sugarcane Payments Pending: उसाचे पेमेंट न मिळाल्याने शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

SCROLL FOR NEXT