Tomato  Agrowon
मार्केट ट्रेंड

Tomato Market: टोमॅटोचा भाव १८० रुपयांवर; तेजीचा शेतकऱ्यांना फायदा नाहीच

Tomato Rate : चालू टोमॅटो हंगामात उत्पादनात मोठी घट झाली. यामुळे बाजारातील आवक कमी होऊन दरात मोठी तेजी आली. मागणीपेक्षा टोमॅटो उपलब्धता कमी असल्याने बाजारात टोमॅटोने १०० रुपयांचा टप्पा पार केला.

Team Agrowon

Vegetable Market : चालू टोमॅटो हंगामात उत्पादनात मोठी घट झाली. यामुळे बाजारातील आवक कमी होऊन दरात मोठी तेजी आली. मागणीपेक्षा टोमॅटो उपलब्धता कमी असल्याने बाजारात टोमॅटोने १०० रुपयांचा टप्पा पार केला. तर अनेक ठिकाणी विक्रमी १५० रुपयांची पातळी ओलांडली. गुजरातमधील भूज येथे टोमॅटोला उच्चांकी प्रतिकिलो १८० रुपयांचा भाव मिळाला. पण टोमॅटोच्या दरातील या तेजीचा शेतकऱ्यांना विशेष फायदा होताना दिसत नाही.

बाजारातील आवक कमी असल्याने टोमॅटोच्या भावात सध्या तेजी आहे. देशातील बहुतांशी बाजारांमध्ये टोमॅटोचे भाव विक्रमी पातळीवर पोचले. टोमॅटोचे भाव वाढण्यामागचे मुख्य कारण म्हणजे उत्पादनातील घट. चालू वर्षी टोमॅटोचे दोन हंगाम शेतकऱ्यांसाठी आतबट्ट्याचे ठरले. उत्पादन खर्चही निघाले नाही. मे आणि जून महिन्यात तर शेतकऱ्यांना टोमॅटो फेकून द्यावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांनी चालू हंगामात लागवड कमी केली.

त्यातच वाढती उष्णता, जूनमध्ये पावसाचा खंड आणि एप्रिल महिन्यातील गारपीटीचा पिकावर परिणाम झाला. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली. उत्पादन केवळ २० टक्केच पीक हाती आल्याचे शेतकरी सांगत आहेत. परिणामी बाजारातील आवक कमी आहे. यामुळे टोमॅटोचे भाव तेजीत आले. पण शेतकऱ्यांना पहिल्या दोन हंगामांमध्ये उत्पादन खर्चही मिळाला नाही. तर चालू हंगामात उत्पादनात मोठी घट होऊन उत्पादन खर्चात मात्र मोठी वाढ झाली. यामुळे सध्याच्या तेजीचा शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत नाही.

देशातील बहुतांशी बाजारांमध्ये टोमॅटोचे भाव शंभरी पार गेले आहेत.  केंद्रीय ग्राहक कल्याण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच ७ जुलै रोजी टोमॅटोचा देशातील सरासरी भाव १०० रुपये प्रितकिलो होता. टोमॅटोचा उच्चांकी भाव १७० रुपये किलो होता. कोलकातामध्ये आज सरासरी १५५ रुपये भाव मिळाला. तर दिल्लीत सरासरी १२३ रुपये होते. मुंबईत १२० रुपये आणि चेन्नईत ११७ रुपयांनी टोमॅटो विकला जात आहे.

सर्वात कमी भाव कुठं मिळाला?
देशातील आजच्या टोमॅटोच्या किमान आणि कमाल दराचा विचार करता गुजरातमधील भूज येथे सर्वाधिक १८० रुपये भाव मिळाला. तर राजस्थानमधील चूरू येथे ३१ रुपये भाव होता. अनेक बाजारांमध्ये आज टोमॅटोने १५० रुपयांची पातळी पार केली. तर देशातील सरासरी भाव आज १०० रुपये प्रतिकिलो होता, अशी माहिती सरकारच्या आकडेवारीवरून मिळाली. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT