Egg Market Rate
Egg Market Rate Agrowon
मार्केट ट्रेंड

Egg Rate: देशभरात अंड्यांच्या दरात विक्रमी वाढ

टीम ॲग्रोवन

देशभरात अंड्याच्या दरामध्ये (Egg Rate) विक्रमी वाढ झाली आहे. कारण गेल्या काही आठवड्यांमध्ये लेयर (layer) आणि बॉयलर (Boiler) कोंबड्यांच्या संगोपनासाठीच्या खर्चात वाढ झाली आहे. तसेच मागणीतही वाढ झाली आहे. कारण भाजीपाल्याच्या दरात (Vegetable Price) झालेल्या वाढीमुळे ग्राहक अंड्याना पसंती देत आहेत. प्रामुख्याने तामिळनाडूमध्ये (Tamilnadu) ही दर वाढ दिसून येत आहे.

देशभरात अंड्याच्या दरामध्ये विक्रमी वाढ झाली आहे. विशेषतः तामिळनाडूमध्ये दरवाढ जास्त आहे. सोयामील, खाद्यतेल व इतर कच्च्या मालाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे लेयर आणि ब्रॉयलर कोंबड्यांच्या संगोपनाचा खर्च वाढलाय. त्यामुळे अंड्यांच्या उत्पादनखर्चात वाढ झालीय. तर दुसऱ्या बाजूला भाजीपाला महागल्यामुळे ग्राहक अंड्यांना पसंती देत आहेत. त्यामुळे अंड्यांची मागणी वाढली आहे.

चेन्नईमध्ये काही रिटेल आऊटलेटमध्ये एक अंडे आठ रूपयाला विकले जात आहे. कोलकत्यामध्ये प्रति नग पाच रूपये ९० पैसे तर मुंबई आणि पुण्यामध्ये पाच रूपये ८५ पैसे दर चालू आहे. नॅशनल एग कोऑर्डीशन कमिटीने (एनईसीसी) एका अंड्याची किंमत ५.५० रुपये निश्चित केली आहे.

यापूर्वी ऑक्टोबर २०२० दरम्यान अंड्याचे दर प्रति नग ५.२५ रुपये या विक्रमी पातळीला पोहोचले होते. गेल्या आठवड्यात अंड्याचे दर सरासरी प्रति नग ५.३५ रुपयांवर पोहचले. कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे कोंबडीखाद्य महाग झाले आहे.

गेल्या काही आठवड्यांमध्ये मक्याचे दर प्रतिकिलो १७ रुपयांवरून २६ रुपयांवर गेले. सोयापेंड दरात सगळ्यात जास्त वाढ झाली. गेल्या वर्षी सुरूवातीला सोयापेंड सरासरी प्रति किलो ३२ रुपयांनी मिळत होती. त्यानंतर दर वाढून १०० रुपयांवर पोहचले.

सध्या सोयामीलचे दर ६२-६५ रुपयांच्या दरम्यान आहेत. सोयामीलमध्ये गेल्या वर्षभरात ४६ टक्के वाढ झाल्याचे जाणकार सांगतात. पोल्ट्रीमध्ये मजुरीचा खर्च २०-३० टक्क्यांनी वाढला आहे. कोंबड्यांना ऊर्जा मिळावी म्हणून दिल्या जाणाऱ्या खाद्यतेलाच्या किमतीही गेल्या वर्षभरात जवळपास दुप्पट झाल्या आहेत. त्यामुळे अंड्याच्या दरात वाढ झाली आहे.

अंड्याचे दर वाढमुळे पोल्ट्री धारक शेतकऱ्यांना मात्र काहीच फायदा मिळत नाही. लेयर कोंबड्यांचे संगोपन करणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ०.१५ ते ०.२० रुपये इतकी तुटपुंजी वाढ मिळाली. तसेच अंड्यातील तेजी जास्त काळ टिकणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.

कमी मोबदला मिळत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी लेयर फार्मिंग केलं नाही. त्यामुळे आता अंड्यांचा तुटवडा पडला आहे. "किमान एक कोटी पक्ष्यांचा तुटवडा आहे. कारण २० टक्के पोल्ट्री फार्म उत्पादनांच्या खर्चात झालेल्या वाढीमुळे अनेक पोल्ट्री फार्म बंद झाले आहेत," असे एका व्यापाऱ्याने सांगितले. पोल्ट्री व्यावसायिकांना कोविड महामारीचा मोठा फटका बसला आहे.

दरम्यान, तामिळनाडूत अंड्याची मागणी वाढली आहे. कारण तिथल्या शाळा सुरू झाल्या आहेत. तामिळमध्ये शालेय पोषण आहारात दुपारच्या जेवणात अंडी वाटप करण्यात येते. या योजनेसाठी तामिळनाडू सरकार ५० लाख अंडी खरेदी करते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Market : दरात तेजीच्या अपेक्षेने तूर उत्पादकांनी विक्री रोखली

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा येलो अलर्ट

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

SCROLL FOR NEXT