Tur Market
Tur Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Tur Market : शेतकरी तुरीची आवक मर्यादीत ठेवणार का ?

Team Agrowon


देशातील बाजारात सध्या तुरीची आवक (Tur Arrival) सरासरीपेक्षा कमीच असल्याचं बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळं यंदा शेतकरी सोयाबीन आणि कापसाप्रमाणं तुरीचीही विक्री गेरजेनुसार करतील की काय? अशी चर्चा सध्या बाजारात सुरु आहे. पण खरंच यंदा शेतकऱ्यांच्या विक्रीवरचं तुरीचे दर (Tur Rate) ठरतील का? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.  

1. सोयाबीनचे दर स्थिर

आंतरराष्ट्रीय बाजारात आजही सोयाबीनच्या दरात चढ उतार होते. आज सोयाबीनचे वायदे १४.७१ डाॅलर प्रतिबुशेल्सवर स्थिरावले. देशातील सोयाबीन बाजार मात्र आजही काहीसा स्थिर होता. आज सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला. आंतरराष्ट्रीय खाद्यतेल बाजारात पुढील काही दिवसांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळं सोयाबीनच्या दरातही मर्यादीत सुधारणा होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
 

2. कापसाचा भाव कायम

देशातील कापूस दर आजही स्थिर होते. आज कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ५०० ते ९ हजार ४०० रुपये दर मिळाला. तर राज्यातील दर ८ हजार ५०० ते ८ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान होते. तिकडं आंतराराष्ट्रीय बाजारात कापसाच्याही दरात चढ उतार सुरु आहेत. त्यामुळं देशातील कापूस दर सुधारण्यावर सध्या तरी मर्यादा येत असल्याचं बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं. जाणकारांच्या मते, जानेवारी महिन्यात कापसाच्या दरात सुधारणा होऊ शकते. 

3. कांदा बाजारभाव दबावात

कांद्याचे दर अद्यापही दबावात आहेत. बाजारात आवक वाढल्यानं दर नरमल्याचं व्यापारी सांगतात. सध्या कांद्याला सरासरी प्रतिक्विंटल १ हजार २०० ते १ हजार ७०० रुपये दर मिळतोय. खरं तर  यंदा राज्यात कांद्याची लागवड कमी होती, असं शेतकरी सांगत होते. त्यामुळं बाजारात पुरवठा मर्यादीत होऊन दर सुधारण्याचा अंदाज होता. मात्र सध्या शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळत आहे. पण पुढील काळात कांदा दरात सुधारणा होऊ शकते, असे जाणकारांनी सांगितले. 

 4. पेरुचे दर अपेक्षेपेक्षा कमीच

राज्यात मागील काही वर्षांपासून पेरुची लागवड वाढली. मात्र पेरुवर प्रक्रिया उद्योग नाही. त्यामुळं थेट खाण्यासाठीच पेरुचा वापर होतो. पण वाढलेल्या उत्पादनाला मागणी कमी राहत असल्यानं पेरु उत्पादक अडचणीत आले आहेत. सध्या पेरुला सरासरी प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ४ हजार रुपये दर मिळतोय. पुढे उन्हाचा चटका वाढल्यानंतर पेरुच्या दरातही सुधारणा दिसू शकते, असा अंदाज पेरू व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.
 

5.  तूर उत्पादनात महत्वाच्या महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमधील बाजारात सध्या तुरीची आवक वाढतेय. मात्र सरासरीपेक्षा सध्या आवक कमीच असल्याचं बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळं यंदा शेतकरी सोयाबीन आणि कापसाप्रमाणं तुरीचीही विक्री गेरजेनुसार करतील की काय? अशी चर्चा सध्या बाजारात सुरु आहे. यंदा देशातील तूर उत्पादन कमीच राहणार हे निश्चित आहे. मात्र उत्पादनात किती घट होणार यावरून सध्या मतभेद आहेत. सरकारने यंदा ३९ लाख टनांचा अंदाज व्यक्त केला. तर उद्योगाचा अंदाज ३२ ते ३५ लाख टनांच्या दरम्यान आहे. मात्र तूर बाजारातील जाणकार यंदा २७ ते ३० लाख टनांवर उत्पादन स्थिरावेल असं सागंत आहेत. तर देशात वर्षाला ४४ लाख टन तुरीचा वापर होतो. म्हणजेच कोणाचाच अंदाज वापराऐवढा नाही. सरकारनेही उत्पादन कमी होणार हे गृहीत धरून आयात वाढवली. मात्र जागतिक बाजारात १० लाख टनांपेक्षा अधिक तूर नसते. त्यामुळं यंदा विक्रमी आयात झाली तरी तूर दर पडणार नाहीत. पण हाती तूर आल्यानंतर शेतकरी विक्री कशी करतात? यावर बाजार बराच अवलंबून राहील असा अंदाज सुरुवातीपासून अभ्यासक व्यक्त करत आहेत. देशात सध्या तुरीला सरासरी ६ हजार ९०० ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. हा दर टिकून राहू शकतात, असंही जाणकारांनी सांगितलं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

Fish Farming : पुनर्वसनग्रस्ताला मिळाला मत्सशेतीतून मोठा आधार

Turmeric Farming : हळदीची वाढली उत्पादकता

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

SCROLL FOR NEXT