Turmeric
Turmeric Agrowon
मार्केट बुलेटीन

Turmeric Rate : सणासुदीतही हळदीला उठाव का नाही?

टीम ॲग्रोवन

सोयाबीन दर काहीसे नरमले

1. सोयाबीनचा नवा हंगाम अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय. देशातील अनेक बाजारांमध्ये नवं सोयाबीन दाखलही होतंय. उद्योग यंदा सोयाबीन पीक चांगलं असल्याचं सांगतोय. मात्र राज्यातील अनेक भागांमध्ये सोयाबीन पिकाला येलो मोझॅक, खोड कीड आणि अतिपावसाचा फटका बसलाय. त्यामुळं उत्पादनात घट होईल, असं शेतकरी सांगत आहेत. सध्या सोयाबीन बाजार काहीसा नरमलेला दिसतोय. सध्या सोयाबीनला ४ हजार ६०० ते ४ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. जाणकारांच्या मते बाजारातील स्थिती पाहता शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन विक्री केल्यास किमान ५ हजार रुपये दर मिळू शकतो.

नवरात्रीमुळं केळीला उठाव

2. नवरात्रीमुळं केळीच्या दरात वाढ झाली आहे. केळी दरात गेल्या सहा महिन्यांपासून अनपेक्षित चढउतार आहे. राज्यात गणेशोत्सवापासून केळीच्या दरात सुधारणा होत गेली. सध्या नवरात्री सुरु झाल्याने दरात आणखी वाढ पाहायला मिळाली. राज्यात सध्या केळीला प्रतिक्विंटल १ हजार ते १५०० रुपये दर मिळतोय. दोन महिन्याच्या तुलनेत हा दर उच्चांकी नसला तरी नवरात्रीमुळे दरात २०० ते ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. मागणीच्या प्रमाणात केळीचा पुरेसा पुरवठा नसल्याने येत्या दोन महिन्यात तरी हे भाव स्थिर राहतील अशी शक्यता केळी उद्योगातून व्यक्त होतेय.

कापूस दर टिकून

3. देशातील अनेक बाजारांमध्ये सध्या नव्या कापासाची आवक सुरु झाली. मागील काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर नरमले आहेत. त्यातच यंदा देशात जास्त कापूस उत्पादनाचा अंदाज व्यक्त होतोय. मात्र कापूस पिकाला अतिपाऊस आणि कीड-रोगाचा फटका बसतोय. तसचं ऑक्टोबरमध्ये पाऊस झाल्यास उत्पादन कमी राहील. सध्या कापसाला सरासरी ८ ते ९ हजार रुपये दर मिळतोय. परंतु कापसाच्या मागणी-पुरवठ्याचं चित्र पाहता कापसाच्या दरात सुधारणा होऊ शकते, यंदा कापसाला सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन विक्री करावी, असं जाणकारांनी सांगितलं.

कोबीच्या दरात सुधारणा

4. बाजारात भाजीपाल्याची आवक कमी असल्यानं दर वाढले आहेत. याचा लाभ कोबीलाही मिळताना दिसतोय. राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर आणि नाशिक या मोठ्या बाजार समित्यांमध्ये कोबीची आवक काहीशी अधिक दिसतेय. मात्र इतर बाजारांमध्ये आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. त्यामुळं केळीला सध्या प्रतिक्विटंल सरासरी १ हजार ते २ हजार रुपये दर मिळतोय. बाजारातील आवक लगेच वाढण्याची शक्यता कमी दिसतेय. त्यामुळं कोबीचा दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतो, असं भाजीपाला व्यापाऱ्यांनी सांगितलं.

सणासुदीतही हळदीला उठाव का नाही?

5. देशातील हळदीचा बाजार (Turmeric Market) सध्या दबावात आहे. केंद्र सरकारनं मागील हंगामात देशातील हळद उत्पादन (Turmeric Production) वाढल्याचं दुसऱ्या सुधारित अंदाजात म्हटलंय. २०२१-२२ मध्ये देशात १३ लाख ३१ हजार टन हळद उत्पादन झालं होतं. तर त्याआधीच्या वर्षी ११ लाख २४ हजार टनांवर उत्पादन स्थिरावलं होतं. मागीलवर्षी हळदीची लागवडही (Turmeric Cultivation) जवळपास तीन लाख हेक्टरवरून साडेतीन लाख हेक्टरवर पोचली होती. मात्र कोरोनानंतर जागतिक पातळीवर हळदीचा वापर घटला होता, त्यात वाढ झालेली दिसली नाही. त्यातच नवरात्रीआधी सप्टेंबरपासून सणांसाठी हळदीला मागणी वाढते. परिणामी दरही (Turmeric Rate) सुधरतात. मात्र यंदा उलटं चित्र दिसतंय. दर वाढण्याऐवजी नरमले आहेत.

यंदा हळदीला नेहमीप्रमाणं मागणी वाढलेली नाही. निर्यातीसाठीही हळदीला उठाव कमी मिळतोय. त्यामुळं हळदीचा जुना साठा पडून आहे. नवी हळद ३ ते ४ महिन्यांमध्ये बाजारात दाखल होईल. त्यामुळं व्यापारी जुना साठा बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. परिणामी हळदीचा बाजार दबावातच आहे. वायदे बाजारातही हळदीचे दर मागील १५ दिवसांमध्ये ४०० रुपयाने कमी झाले. एनसीडीईएक्सवर नोव्हेंबरचे हळदीचे वायदे ७ हजार रुपये प्रतिक्विंटलने झाले. तर इरोड बाजारात हळकुंडाचे दर ६ हजार ७०० रपयांवरून ६ हजार ५०० रुपयांवर आले आहेत. तर निर्यातक्षम हळदीचे दरही ७ हजारांवरून ६ हजार ८०० रुपयापर्यंत कमी झाले. पुढील काही दिवसांमध्ये हळदीच्या दरात काहीशी सुधारणा अपेक्षित आहे. मात्र मोठी तेजी दिसत नाही, असं जाणकारांनी सांगितलं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT