Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Rain Update : दरवर्षी जूनमध्ये सोलापुरात सरासरी १०२.५ पाऊस होतो, या वर्षी फक्त ६५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon
Published on
Updated on

Solapur News : कधी नव्हे ते यावर्षी मे महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. मे महिन्यात झालेल्या २३३ मिलिमीटर सरासरी पावसामुळे यंदा जूनच्या पावसावर शेतकरी फारसे विसंबून राहिले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ९३ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

परंतु, यंदा मृग व आर्द्रा ही दोन्ही नक्षत्र पावसाळ्‍यात कोरडीच गेली. परिणामी खरिपात बळिराजानं पेरलं अन् पावसाने वाऱ्यावर सोडलं, अशीच सध्याची स्थिती आहे. दरवर्षी जूनमध्ये सोलापुरात सरासरी १०२.५ पाऊस होतो, या वर्षी फक्त ६५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

सरासरीच्या ६३.४ टक्केच पाऊस झाला. ८ ते २१ जून दरम्यान यंदा मृग तर २२ जून ते ४ जुलै दरम्यान आर्द्रा नक्षत्र होते. या दोन्ही नक्षत्रात काही दिवसांचा अपवाद वगळता उर्वरित कालावधीत तुरळकच पाऊस झाला. याचा शेतीला फारसा काही उपयोग शेतीला झाला नाही. शेतकऱ्यांनी केलेल्या खरिपांच्या पेरण्यांसाठी आता पाऊस आवश्‍यक आहे.

Kharif Sowing
Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

कधी ढगाळ वातावरण तर कधी कमाल तापमानाचा पारा ३४ ते ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान, असे संमिश्र वातावरण जूनमध्ये राहिले आहे. यंदाच्या पावसाळ्यातील तिसऱ्या पुनर्वसू नक्षत्राला उद्यापासून (शनिवार, ता. ५) सुरुवात होत आहे.

या नक्षत्र प्रवेशाचे वाहन घोडा आहे. यापूर्वीच्या नक्षत्रातील प्रवेशाचे वाहन कोल्हा आणि उंदीर होते. या दोन्ही वाहनांनी निराशा केली आहे. घोडा वाहन असलेल्या पुनर्वसू नक्षत्रात दमदार पाऊस पडावा, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.

Kharif Sowing
June Rainfall : जूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस

पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे यंदा उजनीत जूनमध्ये ७० टक्क्यांच्या दरम्यान पाणीसाठा झाला आहे. यावर्षी मुबलक पाणी राहणार असल्याची खात्री पटल्याने आता शेतकऱ्यांनी उसाच्या लागवडीचे नियोजन सुरू केल्याचे दिसत आहे.

पाण्याची अन् चाऱ्याची चिंता मिटली, पण...

मे महिन्यात झालेल्या मुसळधारमुळे पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याची फारशी

टंचाई जाणवली नाही, त्यामुळे बळिराजा सुखावला होता. यंदा पावसामुळे पीकपाणी चांगले येईल, असे वाटत असतानाच वरुण राजाने उघडीप दिली. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com