
Sangli News : जिल्ह्यात गतवर्षी सप्टेंबरअखेर सतत पावसाचा फटका ऊस लागवडीवर झाला. त्यामुळे आडसाली हंगामातील ऊस लागवडीला फटका बसला. शेतकऱ्यांनी पूर्व आणि सुरु हंगामात ऊस लागवड केली. सन २०२५-२६ या गाळप हंगामात १ लाख ३८ हजार ९०४ हेक्टरवरील ऊस उपलब्ध होणार आहे.
गतवर्षीच्या तुलनेत १ हजार ८०१ हेक्टरने क्षेत्र वाढले असले तरी, आडसाली हंगामातील २ हजार १४९ हेक्टरने क्षेत्र कमी झाले आहे. परंतु पूर्व आणि सुरु हंगामातील क्षेत्रात वाढ झाली आहे. जत तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात उसाच्या क्षेत्रात दुप्पट वाढ झाली असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात स्पष्ट झाले आहे.
नुकत्याच संपलेल्या हंगामात जिल्ह्यात १ लाख ३७ हजार १०३ हेक्टरवरील उसाचे गाळप झाले. सन २०२४-२५ या गाळप हंगामात आडसाली हंगामात ४७ हजार ६३ हेक्टर इतके क्षेत्र होते. जिल्ह्यात गतवर्षी जून महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली. सप्टेंबर अखेर संततधार पाऊस पडत होता. शेतात पाणी साचून राहिले होते.
त्यामुळे शेतकऱ्यांना उसाची लागवड करता आली नाही. आडसाली हंगामातील ऊस लागवड खोळंबली होती. त्यामुळे यंदाच्या हंगामात गाळपासाठी आडसालीचे क्षेत्र १ हजार ८०१ हेक्टरने क्षेत्र कमी झाले आहे.
दरम्यान, गत वर्षी जून महिन्यापासून सप्टेंबर महिन्याअखेर पाऊस सुरु होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी आडसाली हंगामापेक्षा पूर्व आणि सुरु हंगामात ऊस लागवड करण्यास पसंती दिली.
यंदा गाळपाला जाणाऱ्या हंगामासाठी पूर्व हंगामात २२ हजार ८०६ हेक्टर तर सुरु हंगामात १७७४८ हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. सन २०२४-२५ मध्ये पूर्व हंगामात १८ हजार ६८४ हेक्टर तर सुरु हंगामात १५ हजार २०२ हेक्टरवरील उसाचे गाळप झाले होते.
यंदाच्या हंगामात पूर्व हंगामात ४ हजार १२२ हेक्टर आणि सुरु हंगामात २ हजार ५४६ हेक्टरने क्षेत्र वाढले आहे. यंदाच्या हंगामात ६ हजार ७०७ हेक्टरने ऊस क्षेत्र वाढले आहे. गत हंगामात जिल्ह्याची हेक्टरी सरासरी उत्पादकता ८३ टन इतकी होती. यंदाच्या हंगामात हेक्टरी सरासरी उत्पादकता ७७.३३ टक्के इतकी असल्याचा अंदाज संबंधित विभागाने व्यक्त केला आहे.
आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यात क्षेत्र घट
गतवर्षी गाळप झालेल्या हंगामात आटपाडी तालुक्यात २५३३, कवठेमहांकाळ तालुक्यात ४७२२ हेक्टरवर उसाची लागवड होती. यंदा या दोन्ही तालुक्यात गाळपास जाणाऱ्या उसाच्या घट झाली असल्याचे चित्र आहे.
तालुकानिहाय २०२५-२६ गाळपासाठी उपलब्ध असलेले उसाचे क्षेत्र
तालुका क्षेत्र (हेक्टरमध्ये)
मिरज १६७४४
तासगाव ९६१९
पलूस १३७४३
कडेगाव १७३६०
वाळवा ३१२०४
शिराळा १०३८६
खानापूर २००३०
आटपाडी १८७३
कवठेमहांकाळ ५५०५
जत १२४३५
एकूण १३८९०४
लागवड स्थिती...
जत तालुक्यात उसाचे दुप्पट वाढले
आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यात क्षेत्र घटले
खोडव्याच्या क्षेत्रातही घट
जिल्ह्याची सरासरी हेक्टरी उत्पादकता ७७ टन
गतवर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी हेक्टरी उत्पादकतेतही घट
जत तालुक्यात क्षेत्र वाढले
जत तालुका दुष्काळी अशी ओळख आहे. ळात सिंचन योजनेचे पाणी पोहोचले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल ऊस पिकाकडे वाढला असल्याचे चित्र आहे. ऊस पिकाकडे शेतकऱ्यांच कल वाढला आहे.याउलट जत तालुक्यातील स्थिती आहे.
गत हंगामात जत तालुक्यात ५ हजार ६३८ हेक्टरवर उसाचे क्षेत्र होते. मात्र, यंदा तालुक्यात १२ हजार ३४५ हेक्टरवरील ऊस गाळपास उपलब्ध होणार आहे. तालुक्यात आडसाली, पूर्व हंगामी, सुरु या तिन्ही हंगामात शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली आहे. त्याच बरोबर शेतकऱ्यांनी उसाचा खोडवा पीकही ठेवले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.