Soybean Market
Soybean Market  Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : सोयाबीन दबावात का आलं?

Anil Jadhao 

देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे भाव (Soybean Rate) दबावात आहेत. बाजारातील आवक (Soybean Arrival) वाढल्याचा हा परिणाम असल्याचे व्यापारी आणि अभ्यासक सांगत आहेत.

मार्च महिन्यातील आवक जास्त राहील, असा अंदाज प्रक्रिया उद्योगानेही व्यक्त केलाय. मग मार्च महिन्यात सोयाबीनची दरपातळी काय राहू शकते? सोयाबीनचे भाव कधी वाढतील? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.  

1. कापूस दरातील नरमाई कायम

आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस बाजारात (Cotton Market) चढ-उतार सुरु आहेत. कापसाचे भाव सध्या ८० ते ८५ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान फिरत आहेत.

आज कापसाचे वायदे ८० सेंटवर होते. देशातील बाजारातही कापसाच्या दरात (Cotton Rate) नरमाई कायम आहे. सध्या कापसाला सरासरी ७ हजार ७०० ते ८ हजार १०० रुपये दर मिळत आहे. मार्च महिन्यात कापसाची आवक जास्त असल्यानं दर दबावात आहेत.

आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर कापूस दरातही सुधारणा होईल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.  

2. हरभरा दर दबावातच

बाजारातील हरभरा आवक आता हळूहळू वाढत आहे. यंदा हरभरा उतारा घटल्याचे शेतकरी सांगत आहेत. तर नाफेडची खरेदी लवकरच सुरु होणार आहे. त्यामुळे हरभरा बाजाराला आधार मिळण्याची शक्यता आहे.

सध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल ४ हजार २०० ते ४ हजार ६०० रुपये भाव मिळतोय. नाफडेची खरेदी सुरु झाल्यानंतर खुल्या बाजारातील दरही सरासरी ५ हजार रुपयांपर्यंत सुधारतील, असं व्यापारी सांगत आहेत. 

3. तुरीचे दर तेजीतच 

सध्या तुरीचे दर तेजीत आहेत. देशातील बाजारात सध्या तुरीच्या दरात दैनंदिन ५० ते १०० रुपयांपर्यंत चढ-उतार होत आहेत.

पण सरासरी दरपातळी मागील एक महिन्यापासून टिकून आहे. सध्या तुरीला सरासरी ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय.

शेतकरी सध्या तुरीची मर्यादीत विक्री करत आहेत. त्यामुळे तुरीच्या दरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज आहे. यंदाच्या हंगामात तुरीला सरासरी ८ हजार ते ९ हजार रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी सुरु केला. 

4. लसणाला चांगला उठाव

राज्यातील बाजारात मागील काही दिवसांमध्ये लसणाची आवक मर्यादित झाली आहे. सध्या लसणाला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ५०० ते ५ हजार रुपये भाव मिळतोय. लग्नसराई आणि सणांमुळे लसणाला चांगला उठाव आहे.

त्यामुळे लसणाचे दर टिकून आहेत. पुढील काळात बाजारातील लसणाची आवक कमी होऊन दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

मागील काही दिवसांपासून देशातील बाजारात सोयाबीनचे भाव दबावात आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर माल विकायला सुरू केल्याने बाजारातील आवक वाढली आहे.

त्याचा परिणाम सोयाबीनच्या दरावर झाला आहे, असं व्यापारी आणि अभ्यासकांनी सांगितलंय. मार्च महिन्यातील आवक जास्त राहील, असा अंदाज प्रक्रिया उद्योगानेही व्यक्त केलाय.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात जेवढी आवक झाली होती, त्यापेक्षा यंदा मार्च महिन्यातली आवक जास्त आहे. सध्या बाजारात दैनंदिन सरासरी अडीच ते ३ लाख क्विंटलच्या दरम्यान आवक होत आहे. त्यामुळे उद्योगांना गरजेपुरते सोयाबीन मिळत आहे.

म्हणून उद्योगांची खेरदीसाठी स्पर्धा दिसत नाही. सोयाबीन खरेदीसाठी स्पर्धा नसल्याने दरावर दबाव असल्याचे दिसते. सध्या सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांपर्यंत दर मिळतोय.

तर प्रक्रिया प्लांट्सचे दरही ५ हजार ३०० ते ५ हजार ४५० रुपयांच्या दरम्यान आहेत. सध्या आवक जास्त असल्याने दरावर दबाव आहे. पण मार्चनंतर सोयाबीन आवक पुन्हा मर्यादित होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे सोयाबीनचे दरही सुधारतील. तर मार्च महिन्यात सध्याची दरपातळी टिकून राहण्याचा अंदाज आहे. आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दरात सुधारणा होईल, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT