Onion Rate  Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : देशातील बाजारात कांद्याचे भाव नेमके का नरमले?

Market Update : देशभरातील बाजारांमध्ये कांद्याला सरासरी ८०० ते १ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळला. बाजारातील आवक आणखी काही दिवस कायम राहू शकते.

Anil Jadhao 

Market Bulletin : सोयाबीनच्या आंतरराष्ट्रीय बाजारात महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. सोयाबीनचे भाव पुन्हा पडले आहेत. शुक्रवारी म्हणजेच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे सव्वा टक्क्याने कमी होऊन १२.०९ डाॅलरवर बंद झाले होते. तर सोयापेंडचे वायदे अडीच टक्क्याने कमी होऊन पुन्हा ३४९ डाॅलरवर आले होते.

देशातील बाजारातही सोयाबीनच्या भावात काहीशी नरमाई आली. प्रक्रिया प्लांट्सचे भाव ४ हजार ७०० ते ४ हजार ८०० रुपयांवर होते. तर बाजार समित्यांमधील भावपातळी ४ हजार ४०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान आली होती. सोयाबीन बाजारात आवकेचा दबाव असेपर्यंत ही स्थिती राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील वायदे बाजारात कापसाच्या भावात सुधारणा दिसून आली. वायद्यांमध्ये कापसाचे भाव वाढले तरी शेतकऱ्यांना मिळणारा भाव कमीच आहे. कापसाला आजही ६ हजार ६०० ते ७ हजार २०० रुपयांचा भाव मिळाला. तर बाजारातील आवक सरासरी १ लाख ८० हजार गाठींच्या दरम्यान होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव चालू आठवड्यात वाढले, देशातील वायदेही वाढले. यामुळे बाजारातील कापूस आवक कमी झाल्यानंतर दरातही सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशातील बाजारात तुरीच्या भावातील तेजी कायम आहे. तुरीच्या भावाला प्रामुख्याने तीन घटकांचा आधार मिळत आहे. सलग दुसऱ्या वर्षी घटलेले उत्पादन, शेतकऱ्यांची सावध विक्री आणि सरकारची बाजारभावाने खरेदी या घटकांचा तूर बाजाराला आधार मिळत आहे.

त्यामुळे ऐन आवकेच्या हंगामातही तुरीचे भाव सरासरी ९ हजार ते ९ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. यापुढील काळातही तुरीचे भाव तेजीतच राहू शकतात, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

टोमॅटोचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत काही बाजारात सुधारलेले दिसतात. तर काही बाजारांमध्ये आवक जास्त असल्याने भावपातळी आजही कायम होती. राज्यातील अनेक बाजारांमध्ये टोमॅटोची दोन दिवसांपासून काहीशी कमी झालेली दिसते. काही बाजारात टोमॅटोचे भाव काहीसे वाढले असले तरी अपेक्षेपेक्षा भावपातळी कमीच आहे, असे शेतकरी सांगत आहेत.

सध्या टोमॅटोला सरासरी १ हजार २०० ते १ हजार ७०० रुपयांचा भाव मिळत आहे. बाजारातील आवक कमी झाल्यानंतर बाजारालाही आधार मिळू शकतो, असा अंदाज टोमॅटो बाजारातील व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत. 

देशातील बहुतांशी बाजारांमध्ये कांद्याचे भाव सरासरी १ हजार रुपयांपेक्षा झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. बाजारातील आवक कायम आहे. पण काही राज्यांमध्ये लाल कांद्याची आवक वाढत आहे. त्यातच निर्यातबंदी आणि नाफेडची विक्री यामुळे कांदा बाजारवर दबाव कायम आहे.

आज देशभरातील बाजारांमध्ये कांद्याला सरासरी ८०० ते १ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळला. बाजारातील आवक आणखी काही दिवस कायम राहू शकते. त्यामुळे या काळात कांद्याचा भावही कायम दिसू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat GR : अतिवृष्टीबाधितांना ४८० कोटी रुपयांच्या निधी वाटपास मान्यता; शासन निर्णय जारी

Crop Loan: खरीप हंगामात केवळ ३५ टक्के पीककर्ज वाटप

Ethanol Blending: पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण २७ टक्क्यांपर्यंत वाढवा, साखर उद्योगाची मागणी

Cotton Procurement: कापूस खरेदी नोंदणी जलद व पारदर्शक करण्यासाठी ‘ॲग्रीस्टॅक पोर्टल’चा वापर करावा: पणन मंत्री जयकुमार रावल

Dust Pollution: धुळीमुळे श्वसनाच्या आजारात वाढ

SCROLL FOR NEXT