Agriculture Market  Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कापूस, सोयाबीन, मका तसेच काय आहेत तूर दर ?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, मका, तूर आणि लसूण पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये नरमाई कायम आहे. सोया पेंडेच पडलेले भाव आणि खाद्यतेलाच्या दरातील मंदीचा परिणाम दिसून येत आहे. सोयाबीनचे वायदे ११.२३ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३१६ डाॅलर प्रतिटनांवर पोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सतत चढ उतार सुरु होते. देशातील बाजारात सरासरी दरपातळी मात्र टिकून आहे. बाजार समित्यांधील भावपातळी ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. ही स्थिती आणखी काही दिवस दिसू शकते, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत.

कापसाच्या वायद्यांमध्ये आणि बाजार समित्यांमधील भावावरील दबाव कायम आहे. आज दुपारपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे काहसे सुधारून ७१.८१ सेंटवर होते. देशातील वायदे मात्र ५८ हजार रुपयांवर होते. बाजार समित्यांमधील कापसाची आवक घटली आहे. तसेच अनेक बाजारात लिलावही बंद झाले आहेत. तर भावपातळी ७ हजार १०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहे. कापूस बाजारात सध्या अनिश्चित परिस्थिती असून ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

मक्याचं मार्केट सध्या तेजीतच आहे. मक्याचा उठाव कायम असल्याने भावाला चांगला आधार आहे. पोल्ट्री आणि प्रक्रिया उद्योगासोबतच इथेनाॅलमध्येही मागणी वाढली. याचा आधार भावाला होत असून सध्या मका २ हजार ४०० ते २ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. तर एनसीडीईएक्सच्या डिलेव्हरी केद्रांवर मका २८६२ रुपयांनी विकला जात आहे. मक्याच्या भावात आणखी २०० ते ३०० रुपयांपर्यंतची सुधारणा पुढच्या काळात होऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.  

राज्यात लसणाचे भाव तेजीतच आहेत. लसणाची बाजारातील आवक मागणीच्या तुलनेत खूपच कमी आहे. महत्वाच्या लसूण उत्पादक राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील उत्पादक भागात यंदा कमी पाऊस आणि बदलत्या वातावरणाच लसूण पिकाला फटका बसला. त्यामुळे उत्पादन कमी राहून पुरवठा घटला आहे.सध्या लसणाला गुणवत्तेप्रमाणे १४ हजार ते २० हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. लसणाचा पुरवठा आणखी काही महीने कमी राहू शकतो. त्यामुळे लसणाचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.  

देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीच्या भावात काही प्रमाणात चढ उतार सुरु आहेत. सरकारने एखादा निर्णय घेतल्यानंतर तुरीच्या भावात काही आठवडे ५०० ते एक हजार रुपयांपर्यंतचे चढ उतार सुरुवातीपासूनच दिसत आहेत. पण तुरीचा पुरवठा कमी असल्याने दर पुन्हा सरासरी पातळीवर येतात. आयात तुरीच्या भावामुळे आधार मिळत आहेत. त्यामुळे देशातील तुरीच्या भावालाही आधार मिळत आहे. सध्या तुरीला सरासरी १० हजार ५०० ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळत आहे. तुरीच्या बाजारातील तेजी कायम राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT