Tomato Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : टोमॅटोची भावपातळी आज काय राहीली?

Market Update : सध्या तोडा सुरु असलेले प्लाॅटही कमी झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे टोमॅटोच्या भावातील वाढ कायम राहील, असाही अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Anil Jadhao 

Market Bulletin : वायद्यांमध्ये कापसाचे भाव टिकून आहेत. कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात ९०.९१ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायदे एमसीएक्सवर वायदे ५८ हजार ६०० रुपयांवर होते. तर बाजारातील आवक कालही कमी झाली होती.

कापूस आवक १ लाख ४७ हजार गाठींवर आली होती. तरीही कापसाचे भाव दबावातच होते. कापसाचा भाव ६ हजार ५०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला होता. बाजारातील आवक पुढील काळात आणखी कमी होण्याची शक्यता आहे, असे अभ्यासकांनी सांगितले. 

सोयाबीनच्या भावातील नरमाई कायम आहे. सोयाबीनला आजही सरासरी ४ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपयांचा भाव मिळाला. तर बाजारातील आवक आजही ३ लाख ६० हजार पोत्यांच्या दरम्यान कायम होती. बाजारातील आवक कायम असल्याचा दबाव आजही सोयाबीनच्या भावावर दिसून येत आहे, असे व्यापारी सांगत आहेत.

तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनवरील दबाव कायम आहे. सोयाबीनची आवक पुढच्या काही आठवड्यांमध्ये कमी होत जाईल, असा अंदाज असून दरातही काहीशी वाढ होईल, अशी शक्यता सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केली. 

बाजारातील घटती आणि चांगला उठाव, यामुळे टोमॅटोच्या भावात सुधारणा झाली. टोमॅटोचे भाव मागील मागील काही आठवड्यांपासून काहीसे वाढत आहेत. सध्या बाजारात टोमॅटोला सरासरी १ हजार ८०० ते २ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर बाजारातील आवक दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.

सध्या काही भागात पिकाला पाण्याची टंचाई जाणवत आहे. तर सध्या तोडा सुरु असलेले प्लाॅटही कमी झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे टोमॅटोच्या भावातील वाढ कायम राहील, असाही अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

तुरीच्या भावाताल तेजी कायम आहे. सध्या तूर आवकेचा हंगाम आहे. एरवी याच काळात आफ्रिकेतून तूर आयात होत असते. पण यंदा आफ्रिकेतून होणारी तूर आयात कमी आहे. त्यातच उत्पादन घटल्याने शेतकरीही मर्यादीत विक्री करत आहेत.

यामुळे तुरीच्या भावाला चांगलाच आधार आहे. सध्या तुरीला देशात ९हजार ५०० ते १०  हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सध्या बाजारातील तुरीची स्थिती पाहीली तर हा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशातील बाजारात कांद्याच्या भावात पुन्हा नरमाई दिसून आली. कांद्याचे भाव मागील काही दिवसांपासून १ हजार ते १ हजार २०० रुपयांच्या दरम्यान कायम आहेत. सध्या महाराष्ट्रातील कांदा आवक कमी होत आहे. तर गुजरातमधील आवक टिकून आहे.

यामुळे भाववाढीवर दबाव दिसतो, असेही त्यांनी सांगितले. मध्य प्रदेशातील कांदा आवकही सुरु झाली. कांद्याच्या भावावरील दबाव आणखी काही दिवस कायम राहू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT