Jowar Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : ज्वारीच्या दरात कशामुळे झाली वाढ ?

Jowar Market : देशातील बाजारात सध्या ज्वारी चांगलाच भाव खात आहे. देशात मागील दोन वर्षे ज्वारीचे उत्पादन कमीच राहीले.

Team Agrowon

१) वायद्यांमध्ये कापूस सुधारला (Cotton Rate)

वायद्यांमध्ये आज कापूस दरात सुधारणा पाहायला मिळाली. कापसाचे देशातील वायदे आज ५९ हजार ७०० रुपये प्रतिखंडीवर होते. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे ८६.६८ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक कमी होत आहे.

त्यामुळे दर टिकून आहेत. बहुतेक बाजारात कापूस भावाने आता ७ हजारांचा टप्पा पार केला. आज कापसाचे सरासरी दर ६ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. कापसाची आवक पुढील काळात आणखी कमी होईल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

२) सोयाबीनची आवक मंदावली (Soybean Arrival)

देशातील बाजारात सोयाबीनची दरपातळी स्थिरावली आहे. सोयाबीनला आज सरासरी ४ हजार ८०० ते ५ हजार ३०० रुपये दर मिळाला. तर बाजारातील आवक सरासरीपेक्षा जास्तच आहे. आज देशातील बाजारात ९० हजार क्टिंटलच्या दरम्यान कापूस विक्रीसाठी आला, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

खाद्यतेल बाजारावरील दबाव आणि बाजारातील जास्त आवकेचा दरावर परिणाम होत आहे. त्यामुळे सोयाबीनची दरपातळी आणखी काही काळ स्थिर दिसू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

३) काकडीला चांगला उठाव (Cucumber Rate)

बाजारातील काकडी आवक सध्या कमी होत आहे. राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक आणि कोल्हापूर या बाजारांमध्ये आवक अधिक दिसते पण सरासरीपेक्षा कमीच आहे. उन्हामुळे काकडीला चांगला उठाव मिळत आहे.

त्यामुळे काकडीचे भाव मागील आठवड्यापासून टिकून आहेत. काकडीला सरासरी प्रतिक्विंटल १ हजार ५०० ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. काकडीचे भाव तेजीतच राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

४) चिकुचे भाव तेजीत (Chiku Rate)

उन्हामुळे चिकुला सध्या चांगला उठाव मिळत आहे. तर दुसरीकडे बाजारातील आवक मागणीच्या तुलनेत कमी दिसते. राज्यातील मोठ्या बाजारांमध्येही चिकुची आवक कमी आहे. यंदा चिकू उत्पादनाला बदलते वातावरण आणि पावसाचा फटका बसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

त्यामुळे चिकुला ३ हजार ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान मिळत आहे. चिकुचे भाव पुढील काळातही टिकून राहतील, असा अंदाज व्यापारी आणि जाणकार व्यक्त करत आहेत.

५) ज्वारीची बाजारातील आवक कशामुळे कमी झाली? (Jowar Rate)

देशातील बाजारात सध्या ज्वारी चांगलाच भाव खात आहे. देशात मागील दोन वर्षे ज्वारीचे उत्पादन कमीच राहीले. २०१३-१४ मध्ये ५६ लाख टनांवर असेललं ज्वारीचं उत्पादन २०२०-२१ मध्ये ४८ लाख टनांपर्यंत कमी झालं. तर मागील दोन वर्षांमध्ये ज्वारी उत्पादन घटत राहीलं.

यंदा जवळपास ४० लाख टन उत्पादन होईल, असा अंदाज सरकारने व्यक्त केला. पण भरडधान्याविषयी ग्राहकांमध्ये जागृती झाल्याने मागणी वाढली आहे. ज्वारीला मागणी वाढत असताना पुरवठा मात्र कमी झाला.

यंदा खरिप आणि रबी दोन्ही हंगामातील ज्वारी उत्पादन कमी राहीले. यंदा गेल्यावर्षीपेक्षाही देशातील उत्पादन कमी आहे. त्यामुळे ज्वारीच्या दरात तेजी आली आहे. तसा सध्याच्या काळ ज्वारी आवकेचा असतो. रब्बीतील ज्वारीची आवक बाजारांमध्ये येत असते. पण यंदा आवक थांबल्यासारखी स्थिती आहे.

त्यामुळे ज्वारीचे दर ऐन हंगामात वाढले आहेत, असे व्यापारी सांगत आहेत. सध्या ज्वारीला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. खरिपातील माल बाजारात येईपर्यंत ज्वारीची टंचाई कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ज्वारीचे दरही तेजीतच राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT