Jowar Kadba: एक दिवस कडब्याच्या धांदलीतला!

Team Agrowon

धांदलीत एक दिवस

हे करू की ते करू ?इकड फिरू तिकड जाऊ? ह्या धांदलीत एका दिवसाचं काम आठवडाभर रेंगाळत राहिलं आधी जागा ठरवली ,मग तिथली साफसफाई केली ,

Jowar | लक्ष्मण खेडकर

कार्यशाळेसाठी हजेरी

दुस-या दिवसी वटा लागला , पुढच्या दिवशी नवीन रजू झालेल्या शाळेवरला मुख्याध्यापक म्हणून केंद्रात कार्यशाळेसाठी हजेरी लावली ,

Jowar | लक्ष्मण खेडकर

मोटरसायकलवरून प्रवास

असल्या ऊन्हात दिडशे पाऊणेदोनशे किमीचा मोटरसायकलवरून प्रवास करून थकल्याने पुढचा दिवस ही तसाच गेला

Jowar | लक्ष्मण खेडकर

मित्राचा गोतावळा

नंतरच्या दिवसी सरड्या लावला ,त्याच दिवशी शेंडा काढायचा तर मित्राचा गोतावळा भेटायला आल्याने हातात काम टाकून गेलो त्यांना भेटण्यासाठी, नंतरच्या दिवशी शेंडा लावून सगळं काम उरकून टाकायचं ठरवलं.

Jowar | लक्ष्मण खेडकर

गंजीवर चढलो

शेंडा लावायला गंजीवर चढलोअन शेजारच्या गावाचा सरपंच असलेल्या मित्राचा फोन आला.दादा कुठहेस ?तुझ्या गावावरून चाललोय, शेंडा काढल्याशिवाय आता खाली उतरण शक्य नव्हतं.

Jowar | लक्ष्मण खेडकर

शेंडा काढूनचं खाली

मी त्याला थांब म्हणालो पण त्याला महत्वाचं काम असल्यामुळे तो थांबला नाही , त्यामुळे आमची भेट झाली नाही.मग मी शेंडा काढूनचं खाली उतरलो ,उरली सुरली आज बांधाबांध वगैरे करून गंज लावून पूर्ण केली ,वेळ आणि दिवस जास्त लागले पण एक काम हातावेगळं केल्याचं समाधानयं ,चला आता पुढं दुसरं काम करू लवकरच सुरू ,

Jowar | लक्ष्मण खेडकर
Cow | Agrowon
अधिक पाहण्यासाठी क्लिक करा