Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये चढ उतार कायम; कापूस, सोयाबीन, मका तसेच काय आहेत हरभरा दर ?

Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, मका, हरभरा आणि केळी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये काहिशी नरमाई

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात कालच्या तुलनेत आज काहिशी नरमाई दिसून आली. सोयाबीनसह सोयापेंडचे भावही कमी झाले होते. आज दुपारपर्यंत वायदे १०.३३ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३२३ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कायम होता. सोयाबीनचा भाव सध्या ४ हजार ६०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहे. तर प्रक्रिया प्लांट्सनी आपला भाव ४ हजार ८०० ते ४ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान काढला होता. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापूस स्थिरावला

कापसाच्या भावातही चढ उतार कायम आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव आज दुपारपर्यंत शुक्रवारच्या तुलनेत वाढले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे ७३.९४ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते. तर देशातील वायदे आज कमी होऊन ५८ हजार ४१० रुपये प्रतिखंडीवर होते. जागतिक बाजारात सध्या कापसाच्या भावावरील दबाव कायम दिसतो. तर देशातील कापूस पुढील महिनाभरात बाजारात दाखल होईल. त्यामुळे कापसाच्या भावातील चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

केळीला उठाव कायम 

बाजारात सध्या केळीचा उठाव कायम आहे. केळीला गेले महिनाभर श्रावण उपवासामुळे मागणी टिकून होती. तर पुढे गणेशोत्सव आणि नवरात्री या काळातही चांगली मागणी राहण्याची शक्यता आहे. पण दुसरीकडे केळीचा पुरवठा मागणीच्या तुलनेत खूपच कमी आहे. परिणामी केळीला सध्या १ हजार ८०० ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. केळीचा पुरवठा पुढच्या काळातही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे केळीचे भावही टिकून राहतील, असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.   

मक्याचा भाव स्थिरावला

देशात सध्या मक्याला चांगला उठाव आहे. यंदा मक्याला इथेनाॅल क्षेत्राकडून चांगली मागणी आहे. तसेच पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगाचीही खरेदी सुरु आहे. तर दुसरीकडे मक्याचा पुरवठा आणि बाजारातील आवक कमी दिसत आहे. परिणामी मक्याचे टिकून आहेत. पण सरकार धोरणांकडे बाजाराचे लक्ष असून दरवाढीवर काहीसा दबाव दिसत आहे. सध्या मक्याला देशात सरासरी २ हजार ३०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मक्याला यापुढच्या काळातही चांगला उठाव राहील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

हरभऱ्यातील तेजी कायम

हरभऱ्याच्या भावातील तेजी कायम आहे. देशातील अनेक बाजारात हरभऱ्याचा भाव वाढला आहे. सणांमुळे हरभऱ्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण स्टाॅकिस्ट त्या प्रमाणात बाजारात हरभरा आणत नाहीत. परिणामी हरभऱ्याच्या भावात सुधारणा झाली आहे. बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याला सध्या ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पण दुसरीकडे वाढलेल्या भावात मागणी कमी होण्याची शक्यता आहे. तसेच आयात मालही येत आहे. त्यामुळे हरभऱ्याच्या भावात चढ उतार राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT