Soybean Rate : सोयाबीन दरात वाढीचा ट्रेंड

Soybean Market : केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयातशुल्कात वाढ करताच विदर्भातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये सोयाबीन दरात सरासरी ३०० ते ६०० रुपयांची तेजी अनुभवली जात आहे.
Soybean
SoybeanAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयातशुल्कात वाढ करताच विदर्भातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये सोयाबीन दरात सरासरी ३०० ते ६०० रुपयांची तेजी अनुभवली जात आहे. मात्र सोयाबीनची अद्यापही हमीभावापेक्षा कमी दरानेच खरेदी होत असल्याने सरकारने यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

देशांतर्गत खाद्यतेलाची गरज भागविण्यासोबत ग्राहकांना ते कमी दरात उपलब्ध व्हावे याकरिता खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी करण्यात आले होते. मात्र त्याचा विपरीत परिणाम तेलबियांच्या दरावर झाला. सोयाबीनला याचा सर्वाधिक फटका बसत हमीभाव ४८९२ रुपये असताना अवघ्या ३८०० ते ४००० रुपयांनी याचे व्यवहार होत होते.

Soybean
Paddy and Soybean : हरियाणात धान आणि मध्य प्रदेशमध्ये सोयबीन खरेदीची तारीख बदलली

केंद्र सरकारच्या या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात देशभरात संताप व्यक्‍त होत होता. त्यातच मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी सोयाबीनला ६००० रुपयांचा दर मिळावा ही मागणी रेटली होती. त्याकरिता मध्य प्रदेशातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आंदोलन तीव्र करण्यात आले. या सर्व कारणांमुळे केंद्र सरकारवर दबाव वाढला. याचा फटका महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांना बसेल! अशी चिंता सरकारला भेडसावत होती. त्यामुळे केंद्र सरकारने नमते घेत खाद्यतेलावरील आयात शुल्कात वाढीचा निर्णय घेतला. त्यानंतर देशांतर्गत बाजारांमध्ये सोयाबीनच्या किमतीत प्रति क्‍विंटल ३०० ते ६०० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे.

चांदूरबाजार (अमरावती) बाजार समितीत मंगळवारी (ता. १७) दर ४००० ते ४२५० रुपये होते. त्यानंतर सोमवारी (ता. २३) हे दर थेट ४००० ते ४६०० रुपयांवर पोहोचले. यापुढील काळात सोयाबीन दरात आणखी सुधारणा होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. शेगाव (बुलडाणा) बाजार समितीत सोयाबीन ४००० ते ४४५५ रुपयांनी विकल्या जात आहे.

Soybean
Soybean Market : सोयाबीन हमीभावाकडे; पण मक्याने वाढवली चिंता

शेगाव बाजारातील सोयाबीन आवक ही अवघी २० क्‍विंटल इतकी आहे. वाशीम जिल्हा हा सोयाबीनचे हब मानला जातो. सोमवारी या बाजारात सर्वाधिक ६०५० क्‍विंटल सोयाबीन आवक नोंदविण्यात आली. ४०११ ते ४४६५ रुपयांनी सोयाबीनचे व्यवहार झाले. कारंजा (वाशीम) बाजार समितीचा विचार करता या ठिकाणी सोयाबीन आवक ४००० क्‍विंटलपेक्षा अधिक आहे. ४१६० ते ४४७५ असा दर सोयाबीनला कारंजा येथे मिळत आहे.

यवतमाळमध्ये दर ४५४५ रुपये

यवतमाळ बाजार समितीत सोयाबीन दर ४००० ते ४५४५ रुपयांवर पोहोचले आहेत. यापूर्वी ४०५० ते ४१७० असा दर सोयाबीनला मिळत होता. एकंदरीतच बाजाराचा कल बघता सोयाबीनचे दरात आणखी सुधारणा होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com