Market Update Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : तुरीच्या भावात चढ उतार; कापूस, सोयाबीन, गहू तसेच काय आहेत आजचे लसूण दर?

Agriculture Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, गहू, लसूण आणि तूर पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin : सोयाबीन दबावातच

सोयाबीनचे भाव यंदा शेतकऱ्यांना खूपच अडचणीत आणत आहेत. सोयाबीनची बाजारात आवक वाढत असून दर मात्र दबावातच आहेत. हमीभावाने सोयाबीन खरेदीची गती खूपच धीमी आहे. त्यामुळे हमीभाव खरेदीचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही.

सोयाबीनचा सरासरी भाव प्रतिक्विंटल ४ हजार ते ४ हजार २०० रुपयांच्या दरम्यान होते. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये चढ उतार सुरुच आहेत. सोयाबीन सतत १० डाॅलरपेक्षा कमी भावात विकले जात आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापसात सुधारणा

मागील आठवड्यात कापसाच्या भावात सुधारणा झाल्यानंतर बाजारात कापसाचे भाव स्थिरावले आहेत. बाजारातील कापसाची आवकही वाढली आहे. रोज जवळपास १ लाख ८० ते २ लाख गाठींच्या दरम्यान बाजारात आवक होत आहे.

मात्र बाजार टिकून आहे. देशातील बाजारात कापसाचा आज सरासरी भाव ७ हजार ते ७ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान आहे. तर वाद्यांमध्ये चढ उतार सुरु असून ५५ हजार ९४० रुपये प्रतिखंडीवर होते. कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

गहू काहिसा नरमला

गव्हाचे भाव सतत वाढत होते. त्यातच नवा गहू बाजारात दाखल व्हायला किमान ३ महिन्यांचा कालावधी आहे. बाजारातील आवक कमी असल्याने दरात आणखी सुधारणा होण्याचे संकेत मिळत होते. त्यामुळे सरकारने बफर स्टाॅकमधला २५ लाख टन गहू खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतला.

सरकारच्या या निर्णयामुळे गव्हाचे भाव काहिसे कमी झाले. गव्हाची सरासरी दरपातळी २ हजार ३०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान होती. मात्र बाजारातील आवक लक्षात घेता गव्हाच्या भावात पुढच्या काळात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत.

लसूण तेजीतच

लसणाचे बाजारभाव तेजीतच आहेत. देशातील बाजारात लसणाची आवक कमी आहे. तर दुसरीकडे उठाव चांगला आहे. देशातील अनेक भागात लसणाची लागवड सुरु झाली. हा लसून बाजारात येण्याला उशीर होईल.

तर भारतात अफगाणिस्तानमधून लसणाची आयात झाली. पण त्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे लसणाच्या भावातील तेजी कायम आहे. लसणाला घाऊक बाजारात २५ हजार ते ३० हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. लसणाचे भाव आणखी काही दिवस तेजीत राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

तूर टिकून

देशात तुरीची उपलब्धता कमीच आहे. मात्र उपलब्ध साठा आणि आयात तुरीवर सध्या गरज भागवली जात आहे. त्यामुळे दरात चढ उतार सुरु आहेत. यंदा तुरीची लागवड जवळपास १० टक्क्यांनी वाढली.

सध्या अनेक भागात पिकाची स्थितीही चांगली आहे. मात्र यापुढच्या काळात हवामान कसे राहते यावर उत्पादन अवलंबून राहील. सध्या बाजारात तुरीला सरासरी ९ हजार ते १० हजारांचा भाव मिळत आहे. तुरीच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Fragmentation Act: शहरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची महसूल मंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा

QR Code For fertilizer: ‘क्यूआर कोड’वरून कळणार उपलब्ध खते

Bridge For Ghanegar: साकवावरून जीवघेणा प्रवास

Dahanu Floods: डहाणूमध्ये सूर्या नदीला पूर; सतर्कतेचा इशारा

Tree Plantation: दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

SCROLL FOR NEXT