Soybean Market : देशात यंदा सोयाबीनचे गाळप कमी होणार; उत्पादन ६ टक्क्यांनी यंदा वाढले; उद्योगांचा अंदाज 

Soybean Market Update : देशात यंदा सोयाबीनचे उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा ६ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. उत्पादन यंदा जवळपास १२६ लाख टन होईल. मात्र गेल्या हंगामातील शिल्लक सोयाबीन कमी असल्याने हंगामातील एकूण सोयाबीन पुरवठा कमी राहणार आहे.
Soybean
SoybeanAgrowon
Published on
Updated on

Pune News : देशात यंदा सोयाबीनचे उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा ६ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. उत्पादन यंदा जवळपास १२६ लाख टन होईल. मात्र गेल्या हंगामातील शिल्लक सोयाबीन कमी असल्याने हंगामातील एकूण सोयाबीन पुरवठा कमी राहणार आहे. तसेच देशातील सोयाबीनचे गाळप गेल्यावर्षीपेक्षा कमी साडेचार टक्क्यांनी कमी राहणार. यंदा देशात ११७ लाख टन सोयाबीनची गाळप होईल, असा सुरुवातीचा अंदाज सोपाने दिला. 

सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपाने नुकतेच देशातील सोयाबीन उत्पादन आणि वापराचा अंदाज जाहीर केला. देशात यंदा गेल्यावर्षीपेक्षा उत्पादन वाढीचा अंदाज सोपाने जाहीर केला. मात्र तरीही एकूण पुरवठा कमी राहील, असे म्हटले आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे यंदा गेल्यावर्षीचा शिल्लक साठा कमी आहे. त्यामुळे उत्पादन अधिक दिसत असले तरी एकूण पुरवठा कमीच आहे. 

Soybean
Soybean Market : सोयाबीन आवकेत वाढ

असा असेल पुरवठा

सोपाने दिलेल्या अंदाजानुसार यंदा देशात जवळपास १३८ लाख टन सोयाबीनचा पुरवठा असेल. गेल्यावर्षी १४९ लाख टनांचा पुरवठा होता. म्हणजेच यंदा गेल्यावर्षीपेक्षा तब्बल ११ लाख टन कमी पुरवठा असेल. यंदा उत्पादनाचा अंदाज जवळपास १२६ लाख टन आहे. तर गेल्यावर्षी ११९ लाख टन उत्पादन होते.

तर शिल्लक साठा यंदा ९ लाख टन गृहीत धरला असून गेल्यावर्षी २४ लाख टन होता. तर सोयाबीनची आयात ३ लाख होईल, असेही सोपाने गृहीत धरले आहे. म्हणजेच उत्पादन १२६ लाख टन शिल्लक साठा ९ लाख टन आणि आयात ३ लाख टन असा एकूण १३८ लाख टन सोयाबीन पुरवठ्याचा अंदाज सोपाने दिला आहे. 

Soybean
Soybean Market : सरकारनं सावत्र शेतकऱ्यांच्या सोयाबीनले बी भाव द्यावा

शिल्लक स्टाॅक कमी

कोरोनानंतर देशात सोयाबीनचे भाव वाढले होते. बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दर वाढल्याने शेतकरी चांगल्या भावाच्या अपेक्षेने सोयाबीन मागे ठेवत होते. पण २०२२-२३ मध्ये शेतकऱ्यांना थांबूनही अपेक्षित भाव मिळाला नाही.

त्यावेळी शेतकऱ्यांनी २४ लाख टन सोयाबीन मागे ठेवले होते. हा २४ लाख टनांचा साठा २०२३-२४ च्या हंगामात बाहेर आला. थांबूनही दर मिळाले नसल्याने गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन कमी प्रमाणात मागे ठेवले. २०२३-२४ च्या हंगामात केवळ ९ लाख टन सोयाबीन शिल्लक होते. हा शिल्लक स्टाॅक चालू हंगामात बाजारात येईल. 

सोयापेंड उत्पादन आणि निर्यात 

देशात यंदा गाळप कमी होणार त्यामुळे सोयापेंड उत्पादनही गेल्यावर्षीपेक्षा कमी राहील, असे सोपाने म्हटले आहे. गेल्या हंगामात सोयापेंडचे जवळपास ९७ लाख टन उत्पादन झाले होते. ते यंदा ९२ लाख टनांवर स्थिरावण्याचा अंदाज आहे.

तर सोयापेंड निर्यात गेल्यावर्षीच्या जवळपास २३ लाख टनांवरून कमी होऊन १५ लाख ५० हजार टनांवरच राहील. तर देशातील वापर पशुखाद्यात ६६ लाख टन आणि मानवी वापरसाठी ८ लाख ५० हजार असा एकूण ७४ लाख ५० हजार टन होण्याची शक्यता आहे. 


ऑक्टोबरमधील आवक आणि गाळप

सोपाने ऑक्टोबर महिन्यात देशातील बाजारात १८ लाख टन सोयाबीनची आवक झाल्याचे म्हटले आहे. तर ९.५ लाख टनांचे गाळप झाले. ऑक्टोबर २०२३ मध्ये ११.५० लाख टनांचे गाळप झाले होते. तर सोयापेंड उत्पादनही गेल्यावर्षीच्या ९ लाख टनांवरून कमी होऊन ७.५ लाख टन झाले. तर ऑक्टोबरमधील निर्यात १.११ लाख टन राहीली. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com