Agriculture Market Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : हळद भाव सुधारणा अपेक्षित; कापूस, सोयाबीन, हळद, तसेच काया आहेत टोमॅटो दर

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, हळध, टोमॅटो आणि ज्वारी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीन नरमले

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरातील नरमाई कायम आहे. काल सोयाबीनने ऑगस्ट २०२० मधील ९.९३ डाॅलर प्रतिबुशेल्सचा टप्पा गाठला होता. आज दुपापर्यंत दरात काहीशी वाढ झाली होती आणि बाजार १० डाॅलरवर आले होते. पण त्यानंतरही बाजारात चढ उतार कायम राहीले. तर सोयापेंड ३१९ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातही सोयाबीन दबावातच असून सोयाबीनला आजही ४ हजार १०० ते ४ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापसू दबावातच

कापसाचा भाव आजही दबावातच आहेत. जागतिक पातळीवर अनेक देशांमध्ये सध्या अनिश्चित परिस्थिती आहे. त्यामुळे कापसाच्या मागणीवर परिणाम झाला. मागणी घटली आणि विक्री वाढल्याचा परिणाम कापसावर दिसून येत आहे. कापसाचा भाव गेल्या चार वर्षातील सर्वाच निचांकी पातळीवर कायम आहे. आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे ६७.७४ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. देशातील बाजारातही सप्टेंबरचे वायदे ५६ हजार ५०० रुपये प्रतिखंडीवर पोचले होते. तर बाजार समित्यांमधील भाव ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

टोमॅटोचा बाजार नरमला

टोमॅटोच्या भावावरील दबाव आजही कायम होता. बाजारातील टोमॅटोची आवक वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. त्यामुळे टोमॅटोच्या भावावर दबाव आला. राज्यातील सर्वच भागात टोमॅटोची आवक वाढत आहे. त्यामुळे टोमॅटोला सरासरी १७०० ते २५०० रुपयांच्या दरम्यान भव मिळत आहे. टोमॅटोची बाजारातील आवक पुढील एक-दोन आठवड्यात पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे, असे बाजारातील व्यापारी सांगत आहेत. 

हळदीला उठाव

हळदीच्या बाजारात गेल्या काही दोन महिन्यात २० टक्के नरमाई आल्यानंतर सणांमुळे मागणी वाढत आहे. याचा आधार हळदीला मिळू शकतो, असे अभ्यासक सांगत आहेत. सध्या हळदीला सरासरी १२ हजार ते १५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पण सप्टेंबर महिन्यात हळदीला सणांमुळे चांगला उठाव राहू शकतो. देशात हळदीचा स्टाॅक कमी आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारातही हळदीची उपलब्धता कमीच आहे. त्यामुळे हळदीच्या बाजारात पुन्हा एक तेजी येऊ शकते, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.         

ज्वारीचे भाव दबावातच

ज्वारीच्या भावातील तेजी मागील दोन महिन्यांपासून कमी झालेली आहे. बाजारात रब्बीतील ज्वारीची आवक वाढल्यानंतर दरात नरमाई येत गेली. ज्वारीचा बाजार सध्या दबावात आला आहे. राज्यातील बाजारांमध्ये सध्या आवक कमी झाली आहे. पण उठावही स्थिर असल्याने भाव दबावातच आहेत. सध्या ज्वारीला सरासरी वाणानुसार २ हजार ३०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. ज्वारीचे भाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतात, असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.    

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

SCROLL FOR NEXT